गिरणा नदी काठावर असलेल्या भडगाव तालुक्यातील ३ हजार लोकवस्तीचं हे कनाशी हे गाव… या गावात साधारणता १२ व्या शतकात चक्रधर स्वामी हे आल्याचा इतिहास असल्याचं गावातील चक्रधर स्वामी यांचे आश्रमातील निवासी महानुभव पंथाचे महंत लांडगे महाराज सांगतात. चक्रधर स्वामी यांच्या पदस्पर्शाने ही भूमी पवित्र झाली असल्याने चक्रधर स्वामी म्हणजेच महानुभाव पंथाचे आचार विचार येथील संपूर्ण गावकऱ्यांनी स्विकारले असल्याचंही ते म्हणतात. गावात चक्रधर स्वामीचं भव्य असं मंदीर, तसेच आश्रम आहे. याठिकाणी देशभरातून महानुभव पंथांचे अनुयायी दर्शनासाठी येत असतात.
ज्या दिवसापासून गावात चक्रधर स्वामी येवून गेले आहे, त्या दिवसापासून ते आजतागायत या गावातील एकाही ग्रामस्थाने केलेला नाही, तसेच कोणी मद्यापनही करत नाही. तब्बल आठशे वर्षांपासून संपूर्ण गाव हे शाकाहाराची परंपरा पाळतंय. एवढचं नाही तर मांसाहाराला कारण असलेले प्राणी म्हणजेच कोंबडी आणि बकरी सुध्दा या गावात पाळली जात नाही. असेही लांडगे महाराज सांगतात.
हेही वाचा-गाडीत शिवरायांची मूर्ती असल्याने भाविकाला रोखलं, अजित पवारांचा तिरुपती मंदिराच्या ट्रस्टींना फोन
गावातील दुकानांसह, विकासो, दूध डेअरीचे नाव चक्रधर स्वामीच
चक्रधर स्वामींना माणणारे हे संपूर्ण गाव आहे. तर चक्रधर स्वामींच्या विचारांचाही या गावातील ग्रामस्थांवर पगडा आहे. त्यामुळे या गावातील दुकाने, विकास सोसायटी तसेच दूध डेअरी यांचे नाव सुध्दा चक्रधर स्वामी यांच्याच नावाने असल्याचं पहायला मिळतं. गावातील प्रत्येक घराघरात पिढ्यांपासून शाकाहारांचं पालन केलं जातं. यात गावात लग्न करुन आलेल्या सूना जर मांसाहार करत असतील तर त्यासुध्दा सासरच्या परंपरेनुसार शाकाहारी होवून जातात आणि कायमचं शाकाहाराचं पालन करतात, असं गावातील नागरिक सांगतात.
हेही वाचा-Nag Panchami 2022! नागपंचमीला महाराष्ट्रातल्या ‘या’ गावाबद्दल नक्की वाचा, तुम्हालाही वाटेल अभिमान
एखाद्या आजारावर डॉक्टरांनी सांगितलं असेल, तरीही येथील लोक मांसाहार करत नाही, असे सुध्दा नागरिकांचं म्हणणं आहे. प्रत्यक्षात मांस कसं असतं, कसं दिसतं, अंडी कशी असतात कशी दिसतात हे पाहिलेलं नसल्याचे जेव्हा येथील ग्रामस्थ सांगतात तेव्हा मात्र नवल वाटल्याशिवाय राहत नाही. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत या गावातील प्रत्येक ग्रामस्थ हा शाकाहारांचं पालन करत आहे. तर संपूर्ण गावात कुणालाही दारुचं व्यसन सुध्दा नाही. यामुळेच कनाशी या छोट्याशा गावाची राज्यात अनोखी ओळख असून पिढ्या न पिढ्या शाकाहाराचं पालन करणारं राज्यातलं एकमेव गाव आहे.
वर्ध्यातील एक गाव तब्बल चार दिवस पाण्याखालीच; अजित पवारांकडून ऑन द स्पॉट पाहणी