मुंबईः मुंबईसह राज्यात करोनाने हातपाय पसरायला सुरूवात केली आहे. गेल्या काही आठवड्यांपासून नियंत्रणात असलेल्या करोनाने अचानक उचल का खालली असा प्रश्न सध्या सर्वसामान्यांना भेडसावत आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येबाबत एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. ओमिक्रॉनचा सबव्हेरियंट BA 2.12.1 महाराष्ट्रातील काही रुग्णांमध्ये आढळल्याचे सांगण्यात येतंय. महाराष्ट्र व तामिळनाडूत हा व्हेरियंट रुग्णांमध्ये आढळत असल्याचं समोर आलं आहे. अमेरिकेत BA 2.12.1 चा प्रसार वेगाने होत आहे. मात्र, अमेरिकेच्या तुलनेत भारतात त्याचा प्रसार मर्यादित असला तरी पुढील धोका टाळण्यासाठी जीनोम सिक्वेन्सवर भर देण्याच्या सूचना राज्याना करण्यात आल्या आहेत. (Coronavirus in maharashtra)

BA.2.12.1 (ओमिक्रॉन व्हेरियंटचा उपप्रकार), BA.5 आणि BA.4 व्हेरियंटचा जगभरात प्रसार होत आहे. त्याचबरोबर भारतातही काही रुग्ण आढळले आहेत. BA.2.12.1 हा करोनाचा उपप्रकाराचा संसर्ग उत्तर अमिरेकेत वेगाने होत आहे. त्याचबरोबर, महाराष्ट्र आणि तामिळनाडूमध्येही याचे रुग्ण आढळले आहेत.

वाचाः बँक मॅनेजर विजय कुमारच्या हत्येचा सैन्याने १३ दिवसात घेतला बदला; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्रात १५ रुग्णांमध्ये BA.5 आणि BA.4 या व्हेरियंटचे नमुने सापडले आहेत, अशी अधिकृत माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. मात्र, BA.2.12.1 बाबत अद्याप आरोग्य विभागाने कोणतीही माहिती दिली नाहीये. मात्री, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, BA.2.12.1 या व्हेरियंट पुणे आणि इतर काही जिल्ह्यात आढळला आहे. मात्र, त्याचा प्रसार मर्यादित आहे.

वाचाः करोना पुन्हा ठरतोय जीवघेणा!, मुंबईत दोघांचा मृत्यू; राज्यात जवळपास ३ हजार रुग्णांची भर

ओमिक्रोन या व्हेरियंटचे म्युटेशन झाल्यानंतर त्याचे BA.1 आणि BA.2 या दोन उपप्रकार परिवर्तित झाले. रोग प्रतिकारशक्ती कमी असलेल्या रुग्णांना या व्हेरियंटची लागण वेगाने होते. तसंच, हे सर्व व्हेरियंट ओमिक्रनचे उपप्रकार आहेत. मोठ्या प्रमाणात लसीकरण झाल्यामुळं घाबरुन ज्यायची गरज नाही. मात्र, लक्ष ठेवणं गरजेचं आहे, असं संसर्गतज्ज्ञ शहीद जमील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, दिवसभरात राज्यात २,१६५ करोनाबाधित बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण ७७ लाख ४९ हजार २७६ करोनारुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.९० टक्के इतके आहे. पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजने दिलेल्या माहितीनुसार, जनुकीय क्रमनिर्धारणात सध्या राज्यात सर्वाधिक रुग्ण बीए.२ विषाणू उपप्रकाराचे आढळत असून, त्या खालोखाल बीए.२चे ३८ रुग्ण आढळले असल्याचे आरोग्य विभागाने म्हटले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.