मुंबई : महाराष्ट्रात गेल्या १५ जून ते १७ जून या तीन दिवसांमध्ये चार हजारांपेक्षा अधिक रुग्ण संख्या आढळून आली होती. मात्र, आज महाराष्ट्राला दिलासा मिळाला आहे. रुग्णसंख्या चार हजारांच्या खाली आली आहे. महाराष्ट्रात गेल्या २४ तासांमध्ये ३८८३ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर, दोन जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार २८०२ जण करोनातून बरे बर झाले आहेत. महाराष्ट्रातील सक्रिय करोना रुग्णांची संख्या २२८२८ वर पोहोचली आहे. तर, राजधानी मुंबईत २०५४ करोना रुग्णांची नोंद झालीय. मुंबईत गेल्या चोवीस तासात १७४३ जण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या १३६१३ करोना रुग्ण आहेत.

विधानपरिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपला धक्का, रवी राणांविरोधात वॉरंट
महाराष्ट्रात करोना रुग्ण घटले
महाराष्ट्रात गेल्या तीन दिवसांपासून ४ हजारांपेक्षा अधिक करोना रुग्ण आढळून आलेले होते. आज महाराष्ट्रात ३८८३ नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यात १५ जूनला ४०२४, १६ जूनला ४२५५ आणि १७ जूनला ४१६५ रुग्णांची नोंद झाली होती.
नेतृत्त्वानं भेट घेतली नाही! सेनेचे आमदार नाराज? एकनाथ शिंदेंना साईडलाईन केल्याची चर्चा
राज्याच्या आरोग्य विभागानं दिलेल्या माहितीनुसार आज २८०२ जण करोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत महाराष्ट्रात ७७ लाख ६१ हजार ०३२ जण करोनामुक्त झाले आहेत. मुंबईत सध्या १३६१३ सक्रिय रुग्ण आहेत. तर ठाण्यात ४८६९ सक्रिय रुग्ण आहेत.

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण कमी आहे. राज्यात करोना रुग्णसंख्या वाढायला लागल्यानंतर राज्य सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर करण्याच आवाहन केलं होतं. राज्यातील मुंबई, ठाणे, पालघर, पुणे य जिल्ह्यांमध्ये करोना रुग्ण वाढत असल्याचं चित्र आहे. राज्यात सर्वाधिक करोना रुग्णसंख्या मुंबईमध्ये आढळून येत आहे. मुंबईत करोना रुग्ण संख्या घटल्यानं थोडा दिलासा मिळाला आहे. मुंबईत आज २०५४ करोना रुग्ण आढळून आले आहेत. शुक्रवारच्या तुलनेत करोना रुग्णसंख्या घटली आहे. मुंबई आणि नवी दिल्लीमध्ये गेल्या काही दिवसांपासून करोना रुग्णसंख्या वाढली होती.
राष्ट्रपती निवडणूक : नितीशकुमार यंदा आघाडी धर्म पाळणार का? जदयूचा इतिहास काय सांगतो?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.