मुंबई: आर्थिक गैरव्यवहारप्रकरणात ईडीकडे साक्ष देणाऱ्या महिलेला शिवीगाळ केल्याप्रकरणी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संजय राऊत यांनी बलात्कार आणि खुनाची धमकी दिल्याचा आरोप करत महिलेने मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.त्यानुसार भारतीय दंडसंहिता कलम ५०७ अंतर्गत संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर अदखलपात्र गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत मोठी वाढ झाल्याचे मानले जात आहे. राऊत यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर आता भाजप (BJP) नेत्यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात राज्य सरकार मुंबई पोलिसांना कारवाईचे आदेश देणार का, हे पाहावे लागेल.

या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे. महिलांना अशाप्रकारे शिवीगाळ करणं, अशाप्रकारे धमकावणं, या गोष्टी होत असतील तर पोलिसांनी त्याची योग्य चौकशी केली पाहिजे. मग तो कोणीही असो. संजय राऊत यांनी खरंच अशी भाषा वापरली असेल तर त्यांना अटक केली पाहिजे. महाविकास आघाडीच्या काळात टाचणी पडली तरी महिला आयोग लगेच केस घ्यायचा आणि कारवाई करायचा. महिला आयोग लगेच अटक करायची भाषा करायचा. मग आताही त्याच पद्धतीने कारवाई झाली पाहिजे, असे नितेश राणे यांनी म्हटले.

तर शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनीही संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. महिलांना सन्मान देणे ही बाळासाहेब ठाकरे यांची स्वत:ची भूमिका होती. ही भूमिका काय ठेवली जाईल, ही अपेक्षा. राऊतांवर कारवाई करावी की नाही हा त्यांच्या पक्षाचा अंतर्गत मामला आहे. महिलेची तक्रार असेल तर नियमानुसार कारवाई करण्यासाठी राज्य सरकार सक्षम आहे, असे दीपक केसरकर यांनी म्हटले.
सेना फोडूनही हात रिकामेच, ठाकरे परिवाराच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांना किती किंमत द्यायची : संजय राऊत

संजय राऊत हा विकृत माणूस: निलेश राणे

शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची पत्राचाळ प्रकरणी ईडीकडून चौकशी सुरू आहे. याच प्रकरणातील एक महिला साक्षीदार स्वप्ना पाटकर व संजय राऊत यांच्या मोबाईल संभाषण कथित ऑडिओ क्लीप सध्या जोरदार व्हायरल होत आहे. आता याच प्रकरणावरून भाजपचे प्रदेश सचिव रत्नागिरीचे माजी खासदार निलेश राणे यांनीही संजय राऊत यांना जोरदार लक्ष करत बोचऱ्या शब्दांत जहरी टीका केली आहे. निलेश राणे यांनी ट्वीट करून संजय राऊत एक विकृत माणूस असल्याची टीका केली आहे.

संजय राऊत एक विकृत माणूस आहे हे काय लपून राहिलेलं नाही. ७० सेकंदात २७ शिव्या देण्याचा विक्रम संजय राऊत यांच्या नावाने करावा लागेल. हे प्रकार फक्त धमकी देऊन थांबले नसतील तर त्यामागे त्या महिलेला दिलेला त्रास व पुरावे याची पोलिसांनी आणि महिला आयोगाने गंभीर दखल घ्यावीच लागेल, असे निलेश राणे यांनी म्हटले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.