ढाका : बांगलादेशमध्ये ट्रेन आणि मिनीबसच्या अपघातात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, ६ जण गंभीर जखमी झाले आहेत. बांगलादेशमध्ये चटोग्राम जिल्ह्यातील रेल्वे क्रॉसिंगवर ही घटना घडली. हा अपघात ज्या ठिकाणी झाला तिथं रेल्वे विभागाचा कर्मचारी उपस्थित नसतो. रेल्वे येत असल्याचा अंदाज न आल्यानं चालकानं गाडी रेल्वे क्रॉसिंगवर नेली आणि हा अपघात झाला. ही घटना शुक्रवारी घडली आहे. चितगावमधील मिरशाराई मध्ये हा अपघात झाला. अपघातग्रस्त वाहनातून विद्यार्थी आणि शिक्षक प्रवास करत होते. ढाका प्रोवती एक्स्प्रेसनं मिनीबसल एक किलोमीटर अंतरापर्यंत फरपटत नेल्याची माहिती आहे.

मिरशाराई पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी कबीर होस्सेन यांनी या अपघातात विद्यार्थी आणि त्यांच्या शिक्षकांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली आहे. यामध्ये ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला तर ४ शिक्षकांचा मृत्यू झाला.

रेल्वे क्रॉसिंगवर ट्रेनसमोर मिनीबस आल्यानं ट्रेन थांबेपर्यंत जवळपास एक किलोमीटर अंतरापर्यंत बसला फरपटत नेण्यात आलं. यामध्ये बसमधील ११ जणांचा मृत्यू झाला आहे. चटोग्राम अग्निशमन विभागाचे उपजिल्हा संचालक अनिसूर रहमान यांनी घटनास्थळावरुन मृतदेह रुग्णालयात नेण्यात आले त्यानंतर कुटुंबीयांच्याकडे देण्यात आल्याचं म्हटलं आहे. तर, जखमींना चितगाव वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

डोंबिवलीत शिवसेनेच्या शाखेत राडा; शहरप्रमुखाला अटक, वातावरण तापणार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ९ मृतांची ओळख पटवण्यात आली आहे. सर्वजण हाथाजरी उपजा येथील अमन बाजार परिसरातील आर अँड जे प्लस या कोचिंग क्लासचे विद्यार्थी आणि शिक्षक होते. जीसन, साजिब, रकीब आणि रेडवान अशी मृत शिक्षकांची नावं आहेत. तर, हिशाम, आयत, मारुफ, तसफिर आणि हसन अशी मृत विद्यार्थ्यांची ओळख पटली आहे.

सुधीर मुनगंटीवारांच्या नावापुढं कॅबिनेट मंत्रिपद, राज्यपालांच्या हस्ते अनावरण झालेली कोनशिला चर्चेत

हठजारीचे अधिकारी शाहिदुल आलम यांनी ही घटना शुक्रवारी दुपारी १२.४५ वाजता घडल्याची माहिती दिली. रेल्वेक्रॉसिंगवरुन मिनी बस जात होते त्याचवेळी प्रोभाती एक्स्प्रेस आल्यानं हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार विद्यार्थी आणि शिक्षक मिरसराय येथील खैयाछरा धबधबा पाहून परत येत होते. मात्र, त्यावेळी त्यांच्यावर काळानं घाला घातला. रेल्वेकडून या अपघाताची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्यपाल हटाओ, संभाजीराजेंचा नारा, २ ट्विटमधून भगतसिंह कोश्यारींवर हल्लाबोल

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.