मुंबई : बॉलिवूडमधील रोमान्सचा बादशाह शाहरुख खान (Shah Rukh Khan) अनेक कारणांनी चर्चेत असतो. कधी त्याच्या सिनेमामुळे तर कधी त्याचा मुलगा आर्यन खान याच्या ड्रग्ज प्रकरणामुळे (Aryan Khan Drugs ) तर कधी नयनतारा (Nayanthara) हिच्या लग्नात सहभागी झाल्यामुळे. एवढंच नाही तर कधी मुलगी सुहानाच्या बॉलिवूडमध्ये प्रवेशामुळे चर्चेत असतो. आता पुन्हा एकदा शाहरुख चर्चेत आला तो त्याच्या एका जुन्या मुलाखतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे. या मुलाखतीमध्ये शाहरुख म्हणतो की, ‘मी रस्त्यावरून उतरून कपडे काढेन.’ नेमकं काय म्हणाला शाहरुख खान आणि कुणाबद्दल म्हणाला.

दिशा पाटनी की पटानी? नेहमीच चुकीचं लिहिलं जातं अभिनेत्रीचं नाव

जेव्हा शाहरुखनं केलं बोल्ड स्टेटमेंट

शाहरुख फरीदा जलाल (Farida Jalal) यांच्या एका कार्यक्रमात पाहुणा म्हणून सहभागी झाला होता. या मुलाखतीमध्ये शाहरुखनं एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, ‘सर्वात आधी मी कपडे फाडून रस्त्यावर उभा राहीन आणि त्यानंतर कदाचित गोरी गोरी ओ बांकी छोरी हे गाणं गाईन.’


आता तुम्हीदेखील विचारात पडला असाल ना की शाहरुख खाननं हे नेमकं कुणासाठी म्हटलं आहे. तर फरीद जलाल यांच्या या मुलाखतीच्या कार्यक्रमात शाहरुखला त्यांनी विचारलं की, तुझी बायको गौरीनं सांगितलं की, तुझ्यामुळे ती खूप त्रासली आहे आणि तिला घर सोडून जायचं आहे, अशावेळी तू काय करशील. या प्रश्नावर शाहरुखनं हे असं उत्तर दिलं. त्यापुढं तो असंही म्हणाला की, हे गाणं म्हटल्यावर गौरी नक्की परत येईल.

अक्षय कुमारच्या ‘सम्राट पृथ्वीराज’वर भारी पडला ‘सरसेनापती हंबीरराव’

दरम्यान, शाहरुख खानच्या कामाबद्दल सांगायचं तर त्याच्याकडे अनेक सिनेमे आहेत. त्यातील ‘पठाण’ आणि ‘जवान’ सिनेमा पुढच्या वर्षी प्रदर्शित होईल. काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या ‘जवान’ सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्या सिनेमात शाहरुखचा एक वेगळाच लूक चाहत्यांना बघायला मिळणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.