मुंबई : आलियी भट्ट प्रेग्नन्सीमध्येही खूप काम करत आहे. तिचा डार्लिंग्स सिनेमा ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर रिलीज होत आहे. आपल्या सिनेमाबद्दल ती अनेक ठिकाणी जाऊन मीडियाशी, लोकांशी बोलतेय. एका इंटरव्ह्यूमध्ये आलियानं आपल्या मनातल्या गोष्टी उघड केल्या. तिनं यावेळी सांगितलं, ‘अनेक महिलांना दबून राहावं लागतं. त्यांच्यावर सतत दडपणं टाकली जातात. त्यांना मनमोकळं जगताही येत नाही.’

अखेर आमिर खान बोलला- ‘माझं देशावर प्रेम नाही असं का वाटतं?’

‘महिलांना अनेक सल्ले दिले जातात’
या मुलाखतीत आलिया भट्ट म्हणाली, ‘महिलांवर फार वाईट पद्धतीच्या कमेंट होतात. त्यांनी कसं राहावं, काय कपडे घालावेत, यावर टिप्पणी केली जाते. फिल्म इंडस्ट्रीतही सेक्सिझम आहे.’

‘मी ब्रा का लपवायची?’
आपल्या सिनेमाचं प्रमोशन करताना आलिया म्हणाली, ‘जेव्हा महिलांना त्यांची ब्रा लपवायला सांगितली जाते, तेव्हा मला खूप राग येतो. ब्रा का लपवायची? ते एक वस्त्रच आहे ना. पुरुषांना त्यांची अंतवस्त्र लपवायला का नाही सांगितली जात?’ आलिया पुढे म्हणाली, माझ्यावरही सेक्सिस्ट कमेंट झाल्या आहेत. त्यावेळी मी फारसं लक्ष दिलं नाही. पण आता मात्र मी खूप जागरुक झाली आहे. आता मला त्या कमेंटचा अर्थ कळतो.’

‘मी त्रागा करते, तेव्हा माझे काही फ्रेंड्स मला म्हणतात, इतकी संवेदनशील नको राहूस. तू का वैतागली आहेस? तुझे पीरियड चालू आहेत का?’ आलिया सांगते. अभिनेत्री पुढे म्हणाली, पीरियडचा काय संबंध? तुमचा जन्म स्त्रीच्या मासिक पाळीमुळेच झालाय ना?

सामाजिक विषयांवर कलाकार मोकळेपणाने का बोलत नाही? जरा स्पष्टच बोलली उर्मिला

आलियाचे येणारे सिनेमे
आलियाचा आता ५ ऑगस्टला नेटफ्लिक्सवर डार्लिंग्स रिलीज होईल. शिवाय हाॅलिवूड सिनेमात तिनं पहिल्यांदाच काम केलं आहे. रणवीर सिंगबरोबर राजा और रानी की प्रेमकहाणी हा सिनेमा आहे. आणि सगळ्यांना प्रतीक्षा आहे ती रणबीरबरोबरच्या ब्रह्मास्त्र सिनेमाची!

अशोक सराफांसोबतची पहिली भेट विसरूच शकत नाही- रवी जाधवSource link

Leave a Reply

Your email address will not be published.