मुंबई: मुंबईतील परळ येथील वाडिया हॉस्पिटलमध्ये आज संध्याकाळच्या सुमारास आग लागली. हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर ही आग लागली होती. घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाचे आठ बंब आणि पाण्याचे टँकर रवाना करण्यात आले. संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास ही आग लागली होती. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

परळमध्ये आचार्य धोंडे मार्गावर असलेल्या वाडिया हॉस्पिटलमध्ये संध्याकाळी सात वाजेच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. ही आग हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावर आणि नेमकी बालकांच्या वॉर्डजवळ लागली होती, अशी माहिती आहे. आगीच्या घटनेनंतर जवळपासच्या वॉर्डमधील रुग्णांना तातडीने हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी सुरक्षित ठिकाणी आणि इतर वॉर्डमध्ये हलवलं, अशी माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली.

जवळपास दीड तासात ही आग नियंत्रणात आणण्यात आली. आगीत कुणीही जखमी झालेलं नाही आणि कुठलीही जीवितहानी झालेली नाही. पण या आगीमुळे लाकडी साहित्य आणि इलेक्ट्रिक वस्तू जळून खाक झाल्या आहेत. ही आग पहिल्या मजल्यावरील युपीएस रूम लागली होती. यामुळे तळमजला आणि दुसऱ्या मजल्यावर धूर पसरला होता. रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास ही आग आटोक्यात आल्याची माहिती महापालिकेने दिली आहे.

मुंबईकरांसाठी गुड न्यूज: आता बस डेपोमध्ये पार्क करता येणार गाडी; किती चार्ज, कसं बुक कराल; जाणून घ्या एका क्लिकवरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.