मुंबई : मुंबई आणि ठाण्याच्या विकासात आणि विशेषतः मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी-गुजराती समाजांचे योगदान उल्लेखनीय आहे, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी आज येथे केले. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २९) जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. (contribution of rajasthani and gujarati communities in making mumbai the financial capital is remarkable says koshyari)

चौक नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.

शिवसेना मिळवण्यासाठी एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लान; जे आदित्य ठाकरेंनी केले तेच पुन्हा…
आपल्या भाषणात राज्यपालांनी राजस्थानी समाजाच्या दातृत्वाचे कौतुक केले. राजस्थानी आणि मारवाडी समाजाने व्यवसाय करताना केवळ अर्थसंचय न करता शाळा, महाविद्यालये, इस्पितळे बांधली व गोरगरिबांची सेवा केली. राजस्थानी मारवाडी समाज देशात सर्वत्र, तसेच नेपाळ, मॉरिशस आदी देशांमध्ये देखील आहे, असे सांगून जेथे जेथे हा समाज जातो तेथे तो आपल्या स्वभाव व दातृत्वामुळे स्थानिक संस्कृतीशी एकरूप होतो असे राज्यपालांनी सांगितले.

मुंबई हादरली! गोवंडीत आढळले ४ मृतदेह, एकाच कुटुंबातील पती-पत्नी आणि मुलांचा समावेश
भारत देश हा शूरवीरांच्या बलिदानामुळे तसेच दानशूर लोकांच्या दातृत्वामुळे मोठा आहे असे सांगताना त्याग, बलिदान व सेवा यामुळेच जनतेचे प्रेम मिळते आणि म्हणून सर्वांनी समाजासाठी आपले योगदान दिले पाहिजे, असे राज्यपालांनी सांगितले.

आरक्षण निघताच इच्छुकांची मोर्चेबांधणी, प्रति शिर्डी ते स्वामी समर्थ मठ, मतदारांसाठी वर्षा सहलीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.