खेड : मुंबई-गोवा महामार्गावर प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी आहे. कारण, आता प्रतिक्षेत असलेला भरणे नाका येथील उड्डाण पूल अखेर वाहतुकीस खुला झाला आहे. उड्डाण पुलावरील एका मार्गिकेचे काँक्रीटीकरण पूर्ण झाल्यावर या मार्गिकेवरून वाहतूक सुरू करण्यात आली असल्याने वाहन चालकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

गेले तीन वर्ष या पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे भरणे परिसरात वाहतुकीचा खेळखंडोळंबा झाला होता. पावसाळ्यात तर या ठिकाणी वारंवार वाहतूक कोंडी होत होती. आजपासून हा पूल वाहतुकीस खुला झाल्याने येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न निकाली निघाला आहे.

Mumbai Rains : वीकेंड मुंबईकरांच्या भेटीला येतोय पाऊस, वाचा कुठे आणि कधी बरसणार?
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणादरम्यान महामार्गावरील जंक्शन असलेल्या भरणे नाका इथे आधी भुयारी मार्ग प्रस्तावित होता. या ठिकाणी भुयारी मार्गासाठी खोल खड्डाही खणण्यात आला होता. मात्र, अचानक येथील भुयारी मार्ग रद्द करून उड्डाण पूल बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. भरणे नाका जंक्शनवर असणारी वाहतूक, तसेच या ठिकाणी ग्राहकांची होणारी गर्दी लक्षात घेत उड्डाण पुलाचे काम वर्षभरात पूर्ण करणे गरजेचे होते.

अशात कल्याण टोलवेज या ठेकेदार कंपनीकडून गेली तीन वर्षे उड्डाण पुलाचे काम सुरू होते. त्यामुळे भरणे नाका येथील जंक्शनवर नेहमीच वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र पहावयास मिळत होते. पुलाचे काम सुरू झाल्यावर आंबवली विभागातील सुमारे १५ गावांकडे जाणारा रस्ताही बंद झाल्याने या भागात जाणाऱ्या प्रवाशांना वळसा मारून प्रवास करावा लागत होता.

Coronavirus Update : मुंबई, ठाणे, नवी मुंबईत करोना का वाढतोय? आकडेवारीमुळे चिंतेत भरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.