बारामती: भरदिवसा सख्ख्या मावस भावाने तब्बल ३८ वार करून भावाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बारामती एमआयडीसी परिसरातील रुई येथे घडली. गजानन पवार (वय २८) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी मृत युवकाचा मावस भाऊ संतोष गुळमुळे याला पोलिसांनी घटनेनंतर अवघ्या दोन तासात पकडले.

मृत गजानन पवार हे येथील रुई शासकीय रुग्णालयाच्या नजीक वास्तव्यास आहे. सोमवारी दुपारी १२ च्या दरम्यान गजानन यांचा मुलगा शाळेतून घरी आल्यावर त्याने वडिलांना रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे पाहिले. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलाने सदर घटनेची माहिती शेजाऱ्यांच्या मदतीने पोलिसांना दिली.

हेही वाचा –पत्नीची हत्या, पतीने विष घेतलं, सासू-सासरे आणि दीर फरार, हत्येच्या रहस्याने पोलीसही हैराण

घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. पाहणी दरम्यान पोलिसांना गजानन पवार या युवकावर तब्बल ३८ वार झाल्याचे दिसून आले. अतिशय क्रूरपणे केलेली हत्या पाहून पोलीसही हादरले. पोलिसांनी तात्काळ तपासाला सुरुवात करून आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. मात्र, त्यात काही सुगावा लागला नाही. पोलीस तपासात मृत गजानन आणि त्याचा भाऊ संतोष हे दोघे सलूनमध्ये काम करत असल्याचे आणि संतोष हा सतत नशेत असल्याची माहिती मिळाली.

हेही वाचा –बायको सापडत नाही म्हणून फोन, मेव्हणा घरी पाहायला आला, तर दाजीही गायब, दुसऱ्या दिवशी विहिरीत…

त्यानुसार, पोलिसांनी सदर सलून परिसरामधील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता आरोपी संतोष हा तेथून जाताना दिसला. पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी शहरातील बसस्थानक, रेल्वे स्थानक, हॉटेल, ढाबे आदी ठिकाणी पथक पाठवत संतोषला पकडण्यासाठी शोधमोहिम राबविली. अखेर पळून जात असणाऱ्या संतोषला दोन तासाच्या आत कटफळ येथील रेल्वे स्टेशनवरून ताब्यात घेतले. सदरचा खून रागातून झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हेही वाचा –मित्र-मैत्रिणींच्या भावंडांना सल्ले देत असाल तर सांभाळा, पिंपरीत लहान भावाचं धक्कादायक कृत्य

भीषण हत्याकांड! पुण्यात भररस्त्यात तरुणावर ३५ वेळा वार, चाकू भोकसून हत्याSource link

Leave a Reply

Your email address will not be published.