Tips on Parenting Introverted Kids : काही पालक आपल्या खासगी आयुष्यातील समस्यांचा राग किंवा त्यांच्या भावना मुलांवर व्यक्त करत असतात. मग तो कधी राग असतो किंवा कधी चिडचिडेपणा. पालकांचा हा स्वभाग मुलांच्या मेंटल आणि इमोशनल डेव्हलपमेंटमध्ये बाधा निर्माण करतात. मुलांना काहीही बोलणं किंवा मारणं हे त्यांच्या संगोपनात अडथळा निर्माण करू शकतात.

यामुळे मुलांचा आत्मविश्वास डगमळू शकतो. मुलांची प्रत्येक डिमांड पूर्ण करणे शक्य नाही. तसेच अनेकदा पालक देखील परिस्थितीने थकून जातात. पण याचा अर्थ असा नाही की ते मुलांवर वैतागून किंवा थकून त्यांना काहीही बोलतील

अशा अनेक पद्धती आहेत ज्यामुळे पालक अशी परिस्थिती चांगल्या पद्धतीने हाताळू शकते. आपल्या भावना अतिशय व्यवस्थित कंट्रोल करून डील करू शकतात. तुम्ही देखील कधी तुमच्या मुलांवर राग काढलात तर खालील टिप्स तुम्हाला नक्कीच मदत करतील. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​पालकांना का येतो राग

पालकांवर अनेक वेगवेगळ्या जबाबदाऱ्या असतात. घरातील काम, कुटुंबाची जबाबदारी, ऑफिसमधील काम, जेव्हा पालक मुलांची गोष्ट ऐकत नाही तेव्हा पालक अधिक चिडचिड करतात. तसेच कधी पालकांमध्येच घरच्या गोष्टींवरून वाद होतो तेव्हा त्याचा राग देखील मुलांवर होतो. तसेच पालकांना काही शारीरिक व्याधी असतात मानसिक आजारा, थकवा, कमी झोप आणि कामाचा ताण. या सगळ्या गोष्टी पालकांच्या रागाची कारण बनू शकते.

वाचा – Nipple Discharge Without Pregnant : गरोदर नसताना स्तनातून दूध येणं इतकं घातक आहे? याचा थेट कॅन्सरशी तर संबंध नाही ना?))

​पालकांच्या रागाचा मुलांवर होतो परिणाम

पालकांच्या चुकीच्या स्वभावामुळे मुलांमध्ये असुरक्षिततेची भावना येते. यामुळे मुलं आत्मनिर्भर होऊ शकत नाही. तसेच परिस्थिती योग्य पद्धती देखील त्यांना हँडल करता येणार नाही. कारण पालकांच्या स्वभावाचा मुलांच्या मानसिक स्थितीवर खूप मोठा परिणाम होत असतो. मुलांची अपुरी झोप आणि एंग्जायटी सारख्या स्वास्थ समस्या डोकं वर करतात.

(वाचा – Sudha Murthy Tips for Working Mother : नोकरी करताना मुलांसाठी अपराधी भावना वाटतेय, सुधा मूर्तींचा नोकरी करणाऱ्या आईला मोलाचा सल्ला)))

​पालकांनी अशावेळी काय करावं

पालकांना एवढा राग येत असेल तर त्यामागे असंख्य कारण असतात. टेंशन, हृदयाची धडधड वाढणे, पोटावर अतिशय घट्ट वाटणे, धाप लागणे यासारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. साधना करा, योगा करा किंवा छान चालायला जा, मेडिटेशन करा आणि आराम करा. या सगळ्या गोष्टींमुळे तुम्हाला शांत वाटेल. पालकांनी आपलं वागणं देखील तपासून पाहणं गरजेचं आहे. अशावेळी काही वेळ गेल्यानंतर आपल्याला आपल्या चुकीची जाणीव होते.

(वाचा – ‘बाजीराव मस्तानी’मधील मराठमोळी अभिनेत्री दुसऱ्यांदा झाली आई, बाळाचं नाव ठेवलं खास; अर्थ अगदी हटक)

​या पद्धती होतील फायदेशीर

तुम्ही चालणे, गाणी ऐकून, शांत ठिकाणी बसून किंवा पुस्तक वाचून तुमच्या भावना शांत करण्याचा प्रयत्न करू शकता. स्टीम बाथ देखील मनाला आराम करण्यास खूप मदत करते. तसेच छान आवडत्या लोकांची गप्पा मारू शकता. या काळात तुम्ही छान फिरायला जा. कारण असं केल्यामुळे तुम्हाला छान वाटेल आणि त्याचा सकारात्मक परिणाम तुमच्या मुलांमध्ये पाहायला मिळेल.

(वाचा – ugly sides of parenting : सेलिब्रिटी आईंनी पालकत्वाची कुरूप बाजू उलघडली, पाहा काय सांगतायत?)

​प्रोफेशनल गोष्टींची घ्या मदत

जर पालकांना रागावर नियंत्रण ठेवण्यास त्रास होत असेल तर ते समुपदेशक किंवा मानसशास्त्रज्ञांची मदत देखील घेऊ शकतात अन्यथा अशा समस्यांमुळे त्यांच्या मुलाचे तसेच त्यांच्या स्वतःच्या मानसिक आरोग्यासही हानी पोहोचू शकते. कारण शारीरिक आजारासोबतच मानसिक आजार समजून घेणं आणि त्यावर उपचार करणं अतिशय महत्वाचं आहे. तुमच्या या बदलाचा फायदा कुटूंब म्हणून तुम्हालाच होणार आहे. स्वतःची आणि मुलांची काळजी घ्या. हे तुम्हा दोघांकरता महत्वाचं आहे.

(वाचा – Brain Food For Child : बाळाला हे ८ पदार्थ बनवतील आइन्स्टाइनपेक्षाही हुशार; मेंटल आणि फिजिकल वाढीसाठी सर्वात उपयुक्त))

​पालकांनी एकमेकांशी संवाद साधा

अनेकदा पालक म्हणून तुम्ही मुलांच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असाल पण जोडीदार म्हणून तुम्ही थोडं चुकत असाल. अशावेळी पालकांनी एकमेकांची संवाद साधावा. चुकत असाल तर एकमेकांना सांगणे हा चांगल्या आणि आनंदी कुटुंबाची लक्षणे आहेत. त्यामुळे पालक म्हणून तुम्ही काही गोष्टी चुकत असाल तर पालकांनी एकमेकांशी संवाद साधून शेअर करा. कारण तुमची मुलं मातीप्रमाणे असतात तुम्ही आज त्यांना घडवाल तशी ती घडतात.

(वाचा – बराचवेळ गर्भातील बाळाने किक मारली नाही; यामागचं कारण काय? डॉक्टरांकडे जाण्याची योग्य वेळ कोणती?)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.