Are You A Panda Parent : प्रत्येक पालक आपल्या पाल्याच्या संगोपनाकरता वेगवेगळ्या पद्धती वापरत असतो. प्रत्येक पालकाची मुलांचे संगोपन करण्याची पद्धत वेगळी असते. काही पालकांना आपल्या मुलांना शिस्तीत ठेवायला आवडते तर काही पालक मुलांना थोडी मोकळीक देतात. पांडा पालकत्व देखील आहे, एक पालक शैली.

पांडा पालकत्व म्हणजे मुलांना स्वतःचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देणे जेणेकरून ते स्वतः शिकू शकतील. या पालकत्वामध्ये पालक आपल्या मुलाच्या आवडीनिवडींचा आदर करतात आणि गरज पडल्यास त्याला मदतही करतात. अशा प्रकारे मूल आणि पालक यांच्यातील बंध दृढ होऊन मुले स्वावलंबी होतात. ही पालकत्व शैली त्याच्या अद्वितीय फायद्यांमुळे खूप लोकप्रिय झाली आहे. या लेखात आम्ही तुम्हाला पांडाच्या पालकत्वाशी संबंधित काही खास गोष्टी सांगत आहोत. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​मुलांवर विश्वास ठेवायला सुरूवात करा

आजच्या काळात पालकांना आपल्या मुलांकडून खूप अपेक्षा असतात पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या मुलांवर विश्वास ठेवायलाही शिकले पाहिजे. यामुळे मूल आणि पालक यांच्यातील बंध दृढ होतो. या पालकत्वात पालक मुलांच्या जीवनात गरज असेल तेव्हाच हस्तक्षेप करतात. अशा प्रकारे, ही मुले त्यांच्या आयुष्यात स्वतंत्र होतात आणि त्यांच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करतात.

(वाचा – Indian Baby Girl Names : ही नावं ठेवाल; तर खूप मोठा विचार करेल तुमची मुलगी, लेकीची अतिशय क्यूट नावं)

​मुलांना नवीन शिकण्याची संधी द्या

मुलांना प्रश्न विचारण्याची, प्रयोग करण्याची, जोखीम घेण्याची, नियम तोडण्याची, चुका करण्याची आणि मजा करण्याची संधी द्या. तुमच्या मुलावर परिपूर्ण होण्यासाठी दबाव आणू नका. मुलं चुकांमधून शिकतात आणि त्यांना पुढे जाण्याची प्रेरणा मिळते.

(वाचा – Mom Tips : ‘या’ सुंदर अभिनेत्रीकडून सिंगल पॅरेंटिंगच्या टिप्स, करिअर आणि मुलामध्ये असा साधते समतोल))

​संतुलित नातं सांभाळा

पांडा पालकत्वाचा अर्थ आपल्या मुलाला पूर्ण स्वातंत्र्य देणे असा नाही. यामध्येही काही नियम करावे लागणार आहेत. मुलाचा गृहपाठ, खेळण्याची वेळ आणि स्क्रीन वेळ यांचे वेळापत्रक बनवा. तसेच त्याच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष ठेवा पण त्याला त्याचा त्रास होता कामा नये. तसेच मुलाला जे चुकतं ते तेव्हाच सांगण गरजेचं आहे.

(वाचा – C-Section डिलिवरीपासून वाचण्यासाठी फॉलो करो ७ हेल्दी टिप्स; नॉर्मल डिलिवरीची शक्यता वाढेल))

​शांत होऊन नियम लावा

मुलांसह जीवन आश्चर्याने भरलेले आहे. ते चुका करतात आणि पडतात आणि पुन्हा उठतात. मुलांना योग्य मार्गावर ठेवण्यासाठी तुमच्याकडे शिस्त असली पाहिजे, परंतु त्यात भीती नसावी. आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिका आणि मुलावर ओरडू नका. त्यांना नियम लावा पण ते प्रेमाने.

(वाचा – मुलांच्या एकलकोंडेपणाला पालकच जबाबदार; पालकांच्या ‘या’ स्वभावामुळे मुलांवर होतात विपरीत परिणाम)

​मुलांना सपोर्ट करा

मुलांना त्यांच्या पालकांकडून खूप प्रेम मिळायला हवे. तुम्ही त्यांच्या गरजा, कल्पना आणि आवडींमध्ये रस दाखवता. मुलाचे ऐका आणि समजल्यानंतर उत्तर द्या. मुलांच्या पाठीशी तुम्ही खंबीरपणे उभे राहिलात तर त्याला जग जिंकण्याचीही ताकद येते. त्यामुळे मुलांचं संगोपन करताना ही गोष्टी अतिशय महत्वाची आहे. मुलांना आपल्या माणसाचा पाठिंबा असल्यास ते खंबीरपणे कोणतीही गोष्ट करू शकते.

(वाचा – ‘हे’ 5 पदार्थ खाणाऱ्या महिलांच्या मुलांना कधीच होत नाही हृदयाचा आजार; गरोदरपणातच खायला सुरू करा पदार्थ))

​पांडा पॅरेंटिंग टिप्स फॉलो करा

या पालकत्वाच्या शैलीने, तुम्ही मुलांना जीवनात संतुलन आणण्यासाठी, तुमचे हृदय ऐकण्यासाठी आणि तुमचा स्वतःचा मार्ग तयार करण्यासाठी प्रेरित करू शकता. तुम्हाला मुलाला योग्य मार्ग दाखवावा लागेल पण त्याच्या आयुष्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करू नका. मुलाला स्वातंत्र्य दिले पाहिजे, परंतु इतके नाही की तो तुमच्या डोळ्यांसमोर चुकीच्या मार्गावर जाईल.

(वाचा – गर्भवती स्त्रीने इंडियन टॉयलेटमध्ये जाणं पडू शकतं भारी, नंतर फक्त पश्चाताप करण्याची येईल वेळ)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.