अमेरिकन उद्योगपती बिल गेट्स सर्वांनाच परिचित आहेत. बिल गेट्स यांचा जन्म 28 ऑक्टोबर 1955 रोजी सिएटल, वॉशिंग्टन येथे विल्यम एच. गेट्स सीनियर आणि मेरी मॅक्सवेल गेट्स यांच्या घरी झाला. बिल गेट्स यांनी अनेकदा त्यांच्या ब्लॉग्स किंवा मुलाखतीतून त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या अनुभवाबद्दल शेअर केलं आहे.

गेट्स यांनी 1994 मध्ये स्तनाच्या कर्करोगाने आई गमावली. त्यांचे वडील विल्यम एच. गेट्स सीनियर यांचे 14 सप्टेंबर 2020 रोजी अल्झायमर आजाराने निधन झाले. बिल गेट्स पालकांशी असलेल्या नात्याचे अनुभव शेअर करतात. हे त्यांचे टिप्स प्रत्येक पालकांसाठी अधिक फायदेशीर ठरतील. आपल्या मुलाला अब्जाधीश उद्योगपतीच्या रुपात ज्यांना पाहायचं त्या पालकांनी या टिप्स नक्कीच फॉलो करा. (फोटो सौजन्य – टाइम्स ऑफ इंडिया)

​मुलांना त्यांच्या आवडीचं काम करण्याच स्वातंत्र्या द्या

2016 मध्ये एका मुलाखतीत बिल गेट्स यांनी सांगितलं की, “तुम्ही 13 ते 18 या वयोगटातील वेडसरपणाने जी गोष्ट करता, ती गोष्ट तुम्हाला जागतिक दर्जाचा बनण्याची सर्वाधिक संधी असते.” हा त्यांचा स्वानुभाव आहे. बिल गेट्स यांना त्यांच्या पालकांनी मानसशास्त्रज्ञाकडे नेले. त्यावेळी त्यांनी “त्याच्या काही गोष्टींवर तो खूप ठाम कल्पना आहेत. कुटुंबाने याबाबतीत विरोधात जाऊ नका. यामुळे वेळ वाया जाईल”असं सांगतलं.

पुढे एका मुलाखतीत बिल गेट्स यांनी सांगितलं की, वयाच्या 13 व्या वर्षी तो बहुतेक वेळ घरापासून दूर राहायचा. ब्रिटानिकाच्या म्हणण्यानुसार, “गेट्सने वयाच्या 13 व्या वर्षी त्यांचा पहिला सॉफ्टवेअर प्रोग्राम लिहिला. हायस्कूलमध्ये त्यांनी प्रोग्रामरचा एक गट तयार करण्यास मदत केली ज्यांनी त्यांच्या शाळेची वेतन प्रणाली संगणकीकृत केली आणि ट्रॅफ-ओ-डेटा या कंपनीची स्थापना केली ज्याने ट्रॅफिक-काउंटिंग सिस्टम विकले.

यावरून हेच स्पष्ट होते की, बिल गेट्स यांना त्यांच्या पालकांना स्वातंत्र्य दिलं. हे स्वातंत्र्य थोडं अधिक असं नव्हतं. पण थोड्याशा स्वातंत्र्याने त्याला आयुष्यात काय करायचे आहे? हे अधिक स्पष्ट झालं. मुलं तुमची जबाबदारी आहेत, पण त्यांचे भविष्य नाही; त्यांची महत्वाकांक्षा नाही. त्यांची आवड, इच्छा आणि प्रतिभा जोपासण्यासाठी त्यांना स्वातंत्र्य द्या. या स्वातंत्र्यातूनच त्यांना त्यांच वेगळेपण अनुभवता येणार आहे.

(वाचा – एकाच जागी किंवा एखाद्या व्यक्तीकडे एकटक का बघतात लहान मुलं? कारण जाणून हसू आवरणार नाही))

​ज्या गोष्टींमध्ये मुलं चांगली नाहीत त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन द्या

जरी बिल गेट्स हे बहु-कुशल व्यक्ती असले तरी काही गोष्टींमध्ये ते लहानपणी फारसे उत्सुक नव्हते. “गेट्स बर्‍याच गोष्टींमध्ये निपुण होते, परंतु त्याच्या पालकांनी त्यांना पोहणे, सॉकर आणि फुटबॉल यासारख्या गोष्टी करण्यास प्रवृत्त केले ज्यात ते चांगले नव्हते. त्यांनी त्याला संगीताचे धडे घेण्यासही प्रोत्साहन दिले . याचा बिल गेट्स यांना फायदा झाला.

पालक अनेकदा एखाद्या गोष्टीची स्वतः हार मानतात आणि अप्रत्यक्षपणे काही गोष्टी अपयशी ठरल्यास मुलाला हार मानण्यास प्रोत्साहित करतात. बऱ्याच पालकांच्या विश्वासाच्या विरुद्ध, एखाद्या गोष्टीसाठी वारंवार केलेले प्रयत्न कधीही व्यर्थ जाणार नाहीत. त्यामुळे मुलांना कायमच प्रयत्न करण्याचा सल्ला द्या. कळत नकळत त्यांच्यावर भरपूर प्रयत्न आणि मेहनत करण्याचे संस्कार करा.

(वाचा – Baby Names by Father Name : बाप लेकीचं नातं अतिशय खास; लेकीला द्या बाबाच्या नावाशी मिळतं जुळतं नाव, १५ मुलींची नावे

​पालकांनी मुलांना त्यांच्या अपेक्षा आणि ध्येये निश्चित करण्यात मदत करा

बिल गेट्स अब्जाधीश होतील अशी कधीच अपेक्षा केली नव्हती. फक्त त्यांनी एक चांगला आणि सुशिक्षित माणूस व्हावा अशी त्यांची इच्छा ती. त्याप्रमाणे बिल गेट्स यांच्या पालकांनी त्यांच्यावर संस्कार केले. जेव्हा बिल गेट्सने हार्वर्डमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा त्यांच्या पालकांनी त्यांना पाठिंबा दिला होता तरीही हा निर्णय घेणे कठीण होते.

अनेक पालक आपली स्वप्ने आणि महत्त्वाकांक्षा आपल्या मुलावर ढकलतात. पालकांनी आपल्या मुलांसाठी आकांक्षा बाळगणे स्वाभाविक असले तरी, त्यांना कळत नकळत या अपेक्षांच्या ओझ्या खाली ठेवणं अतिशय चुकं आहे. मुलांवरील अवाजवी ओझे केवळ त्यांच्या वाढीस अडथळा आणत नाही तर नवीन गोष्टींबद्दल शिकण्याची त्यांची व्याप्ती देखील मर्यादित करतात. पालक म्हणून तुम्ही जे काही शिकता ते काही वर्षांनी निरर्थक होऊ शकते. मुलाला सध्याच्या वयाबद्दल आणि आताच्या काळाबद्दल शिकणे खूप आवश्यक आहे.

(वाचा – Breastfeeding With Flat Nipples : फ्लॅट निप्पल असलेल्या महिलांनी ब्रेस्ट फिडिंग करताना कोणती काळजी घ्यावी))Source link

Leave a Reply

Your email address will not be published.