मुंबई:सिद्धार्थ जाधव मराठी सिनेमांत जितका लोकप्रिय, तितकाच तो हिंदीतही आहे. तो जेव्हा स्क्रीनवर येतो, तेव्हा एकच धमाल उडवतो. त्याची अफलातून एनर्जी आपण अनेकदा पाहिलीय. अगदी रणवीर सिंगबरोबरही सिंबा सिनेमात त्याची केमिस्ट्री छान जुळली होती. आताही यावर्षी रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमात तो दिसणार आहे. पण आपला सिद्धू जितका सिनेमांना वेळ देतो, तितकाच कुटुंबालाही देतो.

Video : मीडियासमोर अनिरुद्ध मागतोय अरुंधतीची माफी, काय आहे त्याची नवी खेळी?

काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ जाधवला इंटरव्ह्यूसाठी आम्ही फोन केला होता, तेव्हाच त्यानं सांगितलं होतं इट्स फॅमिली टाइम. तो आपल्या कुटुंबाबरोबर दुबईला जाऊन आला. सिद्धार्थचं त्याच्या लेकींवर अतिशय प्रेम. या दोघींसाठीच त्यानं दुबई ट्रिप केली होती. इरा आणि स्वरा या दोन लेकींबरोबरचे दुबईतले फोटो आणि व्हिडिओ सिद्धूनं शेअर केले आहेत. त्यावर तेरा यार हूँ मै गाणं त्यानं लावलंय.


सिद्धार्थ जाधवनं इन्स्टाग्रामवर लिमोझिन कारचा फोटो टाकलाय. त्या कार समोर तो आणि त्याच्या लेकी उभ्या आहेत. गुलाबी रंगाची लांबलचक असलेली ही कार खूपच आकर्षक आहे. किती लांब असेल ही गाडी? असा प्रश्नही त्यानं विचारला आहे. लिमोझिनमध्ये बसून सिद्धार्थचं अख्खं कुटुंब फिरायलाही गेलं.


सिद्धार्थ जाधवची मुलगी इराचा वाढदिवसही तिथे साजरा झाला. तशा पोस्ट सिद्धूनं शेअर केल्या आहेत. सिद्धार्थ जाधव नेहमी पहिलं प्राधान्य आपल्या कुटुंबालाच देत असतो. आपल्या मुलींचाही तो मित्र आहे. मुली त्याच्याशी एकदम मनमोकळ्या वागतात. इरा आणि स्वरा दोघांनाही आपल्या वडिलांचा अभिमान आहे.

उर्वशी कॉलेजमध्ये पोहोचताच ‘ऋषभ, ऋषभ’ ओरडत विद्यार्थ्यांचा गोंगाट; Video Viral

या वर्षी सिद्धार्थ जाधव रोहित शेट्टीच्या सर्कस सिनेमात दिसणार आहे. रणवीर सिंगसोबत त्याची केमिस्ट्री पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे. रणवीरबरोबर त्याची छान मैत्रीही आहे.

वटपौर्णिमा विशेष: जयदीपसाठी अशी नटली सजली गौरी

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.