माझी तुझी रेशीमगाठ : नेहाची मंगळागौर दणक्यात, नटलेल्या परीचा गोड Video झाला व्हायरल
दाखवले बेबी बम्प
सोफी अलिकडेच दुसऱ्यांदा आई झाली आहे. पण तिनं बेबी बम्पचे फोटो शेअर केल्यानंतरच ही चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर तर केवढा तो गहजब! सोफीनं ब्लॅक क्राॅप टाॅप आणि लेगिंग्सबरोबर ग्रे ऑरेंज जॅकेट घातलं आहे. तिचं पुढे आलेलं पोट या फोटोत चांगलंच दिसतंय. म्हणून लोक संभ्रमात पडले आहेत.
कॅप्शनमुळे जास्त चर्चा
सोफी डोळे बंद करून, चेहऱ्यावर स्मित ठेवत बेडवर आडवी आहे. त्यावर तिनं कॅप्शन लिहिली आहे, फुल ऑफ बेबी. हा फोटो पाहून काही नेटकऱ्यांनी ती तिसऱ्यांदा प्रेग्नंट असल्याचं म्हटलंय. एकानं लिहिलं आहे, मला आनंद वाटतोय सोफी. तुझ्या आनंदात मी खूश आहे. दुसऱ्यानं लिहिलंय, बेबीला फीडिंग करू नकोस. तर आणखी एकानं प्रश्न विचारलाय की हा फोटो जुना तर नाही ना? अनेकांना हा फोटो नवा की जुना हे कळत नाहीय. सोफीनं सगळ्यांनाच कोड्यात टाकलंय.
चला चला विरोध करा… ‘हर घर तिरंगा’ अभियानावर शशांकची sarcastic पोस्ट
जुलैमध्ये जन्मलं दुसरं बाळ
सोफी टर्नर आणि जाॅ जोनस यांनी २९ जून २०१९ रोजी लग्न केलं. त्यांना पहिली मुलगी आहे. तिचं नाव विला. आता १४ जुलैला त्यांना दुसरी मुलगी झालीय. सोफी हाॅलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.
रणबीर काम करताना पूर्ण झोकून देतो, सांगतेय ‘शमशेरा’ची आई आणि पत्नी!