लातूर : यंदा विदर्भ आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढल्याने विविध नद्यांना पूर आला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा तालुक्यातही भेटा आणि अंदोरा येथे मुसळधार पाऊस झाला असून नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे शाळकरी विद्यार्थी आणि शेतकरी काठावरच अडकल्याची घटना घडली. अखेर नदीच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या दोरीच्या साहाय्याने मानवी साखळी करून जीव मुठीत धरून अडकून पडलेल्या नागरिकांनी नदी पार केली आणि सगळ्यांचाच जीव भांड्यात पडला.

दोन दिवसापूर्वी औसा, निलंगा तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. परिणामी शेतकऱ्यांची चांगलीच दैना उडाली होती. अनेक हेक्टर क्षेत्र पाण्याखाली गेले. तसंच काही हेक्टरवरील जमिनी खरवडून गेल्या आहेत. आता पुन्हा औसा तालुक्यातील भेटा-अंदोरा येथे गुरुवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाला. पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली होती.

हायप्रोफाईल खटले लढवणारे उज्ज्वल निकम एकनाथ शिंदेंच्या भेटीला, तर्कवितर्कांना उधाण

भेटा-अंदोरा पुलाची मागणी

भेटा-अंदोरा येथील नदीवर पुलाची उंची कमी आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस झाल्यास अनेकदा पुलावरून पाणी वाहते. शिवाय हा पूल बराच जुना आहे. त्यामुळे पुराच्या पाण्याचा वेग वाढल्यास पूल वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे या पुलाची उंची वाढवण्याची मागणी अनेक वेळा प्रशासनाकडे करण्यात आली आहे. मात्र प्रशासन लक्ष देत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.