नवी दिल्ली: पाकिस्तानविरुद्ध झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात श्रीलंकेने २४६ धावांनी धमाकेदार विजय मिळवला. या विजयामुळे आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेत श्रीलंकेचा फायदा झाला. अर्थात या विजयामुळे गुणतक्त्यात त्याचे स्थान आहे तेच राहिले, मात्र श्रीलंकेला त्याचा फटका बसलाय.

दुसऱ्या कसोटीतील पराभवानंतर पाकिस्तान चौथ्या क्रमांकावरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. श्रीलंकेच्या या विजयाचा फायदा भारतीय क्रिकेट संघाला झालाय. भारत आता चौथ्या स्थानावर पोहोचलाय.

वाचा- भारताने पराभव केला त्यात आमच काय चुकलं; इंग्लंडनं ‘या’ संघावर काढला राग

गुणतक्त्यात सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ अव्वल स्थानावर आहे. आफ्रिकेने ७ पैकी ५ सामन्यात विजय मिळवला आहे. तर दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाने १० पैकी ६ सामन्यात विजय मिळवला आहे. श्रीलंकेच्या संघाने १० पैकी ५ विजय ४ पराभव आणि १ ड्रॉसह तिसरे स्थान कायम राखले आहे. भारत १२ पैकी ६ मध्ये विजय, ४ पराभव आणि २ ड्रॉसह चौथ्या स्थानावर आहे.

वाचा- CWG 2022 : भारतीय महिला संघाला पहिल्या सामन्यापूर्वी मिळाली आनंदाची बातमी, पाहा काय घडलं

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दुसऱ्या सत्रात आयसीसीने थोडे बदल केले आहेत. यावेळी सामना जिंकल्यावर १२ गुण, टाय झाल्यावर ६, ड्रॉ झाल्यास ४ तर पराभव झाल्यास गुण नाही. गुणतक्त्यातील संघांचे स्थान विजयाच्या टक्केवारीवर ठरणार आहे. सामना जिंकल्यास १०० टक्के, टाय झाल्यास ५० टक्के आणि ड्रॉ झाल्यास ३३.३३ टक्के मिळणार आहेत.

दुसऱ्या कसोटीत श्रीलंकेने पहिल्या डावात ३७८ धावा केल्या होत्या. उत्तरादाखल पाकिस्तानला २३१ धावा करता आल्या. पहिल्या डावात पिछाडीवर पडलेल्या पाकिस्तानला श्रीलंकेने दुसऱ्या डावात ३६० धावा करून मोठे आव्हान दिले. मात्र त्यांचा डाव २६१ धावांत संपुष्टात आला.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.