मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परब यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. ईडीनं अनिल परब यांना उद्या ईडी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. साई रिसॉर्टप्रकरणी ईडीकडून तपास सुरु आहे. मे महिन्यात साई रिसॉर्टप्रकरणी ईडीनं ७ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यादिवशी अनिल परब यांची १३ तास चौकशी करण्यात आली होती. आता अनिल परब यांना ईडीनं समन्स दिलं आहे. साई रिसॉर्ट प्रकरणी ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. ईडीला साई रिसॉर्टच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग झाल्याचा संशय आहे. ईडीनं आता पुन्हा एकदा अनिल परब यांना ईडीनं समन्स दिलं आहे. अनिल परब उद्या ईडीच्या चौकशीसाठी हजर राहणार का हे पाहावं लागणार आहे.

अनिल परब यांना उद्या हजर राहण्याचे समन्स
शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर ईडीनं २६ मे रोजी छापे टाकले होते. ईडीनं २६ मे रोजी साई रिसॉर्ट प्रकरणी सात ठिकाणी छापे टाकले होते. ईडीनं त्या दिवशी अनिल परब यांची १३ तास चौकशी केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा ईडीनं अनिल परब यांना चौकशीसाठी समन्स पाठवलं आहे. अनिल परब यांना १५ जून रोजी सकाळी मुंबईतील ईडी कार्यालयात उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

तीन पक्षांचे सरकार, ‘तुम हमारी खेचो, हम तुम्हारे खेचेंगे’, गुलाबरावांची टोलेबाजी

शिवसेना नेते अनिल परब यांनी २६ मे रोजी झालेल्या छापेमारीनंतर दापोलीतील साई रिसॉर्टचे मालक नसल्याचं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा ईडीनं अनिल परब यांना समन्स दिलं आहे.

मंत्रीजी पैसे कुठून आले? करोनामुळं स्मृती गेली, सत्येंद्र जैन यांचं ईडीला उत्तर

अनिल परब ईडी चौकशीला हजर राहणार ?
अनिल परब ईडीनं समन्स बजावल्यानंतर उद्या होणाऱ्या चौकशीला हजर राहणार की आणखी वेळ वाढवून मागणार हे उद्या स्पष्ट होईल. अनिल परब यांच्यावर दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आरोप केले होते. किरीट सोमय्यांनी दापोलीमध्ये जाऊन साई रिसॉर्टला भेट देण्याचा प्रयत्न देखील केला होता.
आमच्यासाठी भाषण महत्त्वाचं नाही, वारकऱ्यांच्या आनंदात मिठाचा खडा टाकू नका : दरेकरSource link

Leave a Reply

Your email address will not be published.