अहमदनगर : शिवसेनेच्या बंडखोरांना गद्दार म्हणने न म्हण्यावरून शिवसेनेच्या गटांत दावे प्रतिदावे सुरू आहेत. त्यात आता भाजपचे अहमदनगरचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनीही भर टाकली आहे. ‘शिवसेनेतील शिंदे गटावर गद्दारीचा आरोप केला जातो, पण पहिली गद्दारी कुणी केली? भाजप सेनेची युती होती तेव्हा पंतप्रधान नरेंद मोदींचा फोटो वापरुन निवडून आले? मुख्यमंत्री होण्यासाठी भाजपला सोडून काँग्रेस राष्टवादीशी कोणी युती केली? मग पहिले गद्दार कोण?’ असे सवाल डॉ. विखे पाटील यांनी उपस्थित केले आहेत.राष्ट्रीय वयोश्री योजनेतील लाभार्थ्यांना साहित्य वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील हेही उपस्थित होते.

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार हे शिवसेनेला संपवतील हे म्हणणारा मी पहिला खासदार होतो. ४० आमदारांना शिवसेना सोडून का जावे लागले? त्यात ८ कॅबिनेट मंत्री होते. मुख्यमंत्री सेनेचा असतानाही सेनेच्या आमदारांना राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे निधीसाठी जावे लागे. आता शेतकरी, जनतेच्या हितासाठी शिंदे-फडणवीस सरकार बनले. भाजप हा त्यागाचा पक्ष आहे. पक्षाचे १०६ आमदार असतानाही ४० आमदार असलेल्‍या गटाचा मुख्‍यमंत्री भाजपाने करुन दाखविला आहे,’ असेही विखे पाटील म्हणाले.

निहार ठाकरेंचा पाठिंबा शिंदे गटाला, चार नातेवाईक चार वेगवेगळ्या पक्षात

खासदार डॉ. विखे पाटील म्हणाले, ‘देशाच्या पंतप्रधानपदी जोपर्यंत मोदी आहेत, तोपर्यंत देश सुखी राहील. राज्यातील महाआघाडी सरकारच्या काळात राज्य पिछाडीवर गेले होते. आता पंतप्रधान मोदींच्या मार्गदर्शनाखालील शिंदे- फडणवीस सरकार राज्याला काही दिवसात नंबर एक वर नेतील,’ असेही ते म्हणाले.

CWG 2022 : राष्ट्रकुल स्पर्धेत मराठीचा डंका, भारताला पहिलं पदक, सांगलीच्या संकेतला सिल्व्हर मेडल!

ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीवर टीका केली. ते म्हणाले, ‘करोना काळात जनतेला, शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडणारे महाआघाडी सरकार हे भिकारबोंबले सरकार होते. दोन वर्ष जनता होरपळली होती. मंत्र्यांचे दररोज पैसे खाण्याचे प्रकरणे बाहेर येत होते. त्या सरकारच्या काळात फक्त भ्रष्टाचार होता, विकास थांबला होता. अशा परिस्थितीत फक्त केद्राचीच मदत नागरिकांना, शेतकर्‍यांना मिळत होती. राज्यात सत्तापरिवर्तन झाले. शिंदे-फडणवीस यांच्या सरकारमुळे नवीन पर्व सुरु झाले. आपल्याला खात्री आहे की, काही महिन्यात निर्णय होतील. त्यामुळे राज्य प्रथम क्रमांकावर पुन्हा येईल,’ असा विश्‍वास त्‍यांनी व्‍यक्‍त केला.

आनंद दिघेंसोबत घडलेल्या घटना मी पाहिल्यात, जास्तीचं बोलाल तर मी माझं तोंड उघडेल : एकनाथ शिंदे

राऊतांचं हायकमांड ‘सिल्वर ओक’वर!; विखे-पाटलांचा निशाणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.