Deepak Kesarkar: मी हा सगळा प्रकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कानावर घातला. तेव्हा पंतप्रधान मोदी (PM Narendra Modi) यांनी माझे म्हणणे नीट ऐकून घेतले. त्यानंतर पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यात डायलॉग सुरु झाला होता. हे दोन्ही मोठे नेते आहेत. आम्ही या दोघांचे म्हणणे व्यवस्थितपर्यंत एकमेकांपर्यंत पोहोचवत होतो.

 

PM Modi Uddhav Thackeray (2)
उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी

हायलाइट्स:

  • मी पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्याला जास्त महत्त्व देतो
  • उद्धव ठाकरे १५ दिवसांत आपल्या पदाचा त्याग करणार होते
  • उद्धव ठाकरे यांनी काहीवेळ मागून घेतला होता
मुंबई: सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपांनंतर पंतप्रधान मोदी (PM Modi) आणि उद्धव ठाकरे यांच्यात ‘डायलॉग’ सुरु झाला होता. या सगळ्यानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपद सोडून भाजपसोबत यायलाही तयार झाले होते. मात्र, नारायण राणे (Narayan Rane) यांच्या केंद्रीय मंत्रिमडळातील समावेशामुळे ऐनवेळी ही बोलणी फिस्कटली, असा दावा एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी केला. ते शुक्रवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. (Eknath Shinde camp Deepak Kesarkar press conference in Mumbai)

यावेळी दीपक केसरकर यांनी मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात सुरु झालेल्या वाटाघाटींचा वृत्तांत कथन केला. उद्धव ठाकरे हे दिल्लीत पंतप्रधान मोदी यांना भेटले होते. या भेटीत झालेल्या चर्चेची माहिती उद्धव ठाकरे यांनी मला दिली होती. उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना स्पष्ट सांगितलं होतं की, ‘मी पदापेक्षा तुमच्याशी असलेले कौटुंबिक संबंध जपण्याला जास्त महत्त्व देतो’. त्यानंतर उद्धव ठाकरे १५ दिवसांत आपल्या पदाचा त्याग करणार होते. पण ते जेव्हा मुंबईला परत आले तेव्हा त्यांच्या लक्षात आले की, आपण या गोष्टी कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत. नाहीतर कार्यकर्त्यांचा गैरसमज होऊ शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी काहीवेळ मागून घेतला होता. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून त्यांना हा वेळ देण्यात आल्याचे दीपक केसरकर यांनी सांगितले.
Deepak Kesarkar: नवा ट्विस्ट! शिंदे गटाकडून आदित्य ठाकरेंचा बचाव, केसरकरांनी थेट नारायण राणेंना तोंडघशी पाडले
यादरम्यान जी बोलणी झाली होती, त्यामध्ये पक्षाचे प्रमुख आणि कुटुंबप्रमुख म्हणून मोदीजींनी सर्व गोष्टी उद्धव ठाकरे यांच्या मनाप्रमाणे करण्याची तयारी दर्शविली होती. या सगळ्याची माहिती आम्हा तिघांनाच होती. याशिवाय, ही गोष्ट रश्मी ठाकरे यांनाही ठाऊक होती. परंतु, यामध्ये खूप वेळ गेला आणि दरम्यानच्या काळात विधानसभा अधिवेशनात भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन झाले. तेव्हादेखील भाजपकडून उद्धव ठाकरे यांना निरोप आला होता. आपल्यात बोलणी सुरु आहेत, अशावेळी भाजप आमदारांचे इतक्या दीर्घकाळासाठी निलंबन करणे योग्य नाही, असे सांगण्यात आले होते. त्यामुळे की काय किंवा अन्य कोणत्या कारणामुळे असेल नंतरच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळात नारायण राणे यांचा समावेश झाला. ही गोष्टी उद्धव ठाकरे यांना आवडली नाही. त्यामुळे ही बोलणी थांबली, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.
संजय राऊत ईडी कोठडीत, ‘सामना’च्या संपादक पदाबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय
त्यानंतर दोन महिन्यांनी माझं उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणं झालं. तेव्हा उद्धवसाहेबांनी म्हटले होते की, लहान लहान गोष्टी होत राहतात. पण पुन्हा बोलणी सुरु होऊन त्यामधून काही चांगलं निष्पन्न व्हावं, असे उद्धव ठाकरे यांना वाटत होते. पण उद्धव ठाकरे यांच्याकडे असणाऱ्या वेळेच्या अभावामुळे ते शक्य झाले नाही, असे दीपक केसरकर यांनी सांगितले.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : Marathi News from Maharashtra Times, TIL NetworkSource link

Leave a Reply

Your email address will not be published.