मुंबई: Mhada Lottery महानगरात स्वस्तात घरे उपलब्ध करून देणाऱ्या म्हाडाने उत्पन्न मर्यादेत मोठा बदल केला आहे. राज्य सरकारच्या २५ मेच्या आदेशानुसार म्हाडाच्या सोडतीच्या उत्पन्नाच्या मर्यादेत बदल केलाय. यानुसार मुंबई, ठाणे, पुण्यासह मोठ्या महानगरातील १८ लाखांहून अधिक वार्षिक उत्पन्न असलेल्यांना म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार नाही. सरकारने या महानगरांत उच्च उत्पन्न गटासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा १२ लाख ते १८ लाख निश्चित केली आहे.

म्हाडाच्या घरासाठी अर्ज करणाऱ्यांपैकी महिन्याला ७५ हजार रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न असणाऱ्या व्यक्ती आणि कुटुंबाचा समावेश उच्च उत्पन्न गटात केला जात होता. पण यापुढे महिन्याचे उत्पन्न दीड लाख रुपयांपर्यंत असणारे उच्च उत्पन्न गटात येतील. मासिक उत्पन्न दीड लाखांपेक्षा अधिक असणाऱ्यांना छोट्या शहरातील म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करता येईल.

वाचा- खासगी बाटली बंद पाणी विक्रीला मुभा!, रेलनीरच्या पाण्याच्या तुटवड्यामुळे निर्णय

यासंदर्भात राज्य सरकारने २५ मे रोजी एक अध्यादेश जारी केलाय. यानुसार उच्च उत्पन्न गटासाठी वार्षिक मर्यादा ९ लाखावरून आता १२ ते १८ अशी केली आहे. याचा अर्थ ज्या व्यक्ती, कुटुंबाचे मासिक उत्पन्न दीड लाखांपर्यंत असेल तेच मुंबई, ठाणे, पुणे आणि इतर मोठ्या शहरातील म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करू शकतील. सरकारच्या या निर्णयामुळे उच्च उत्पन्न गटात येणारे प्रशासकीय अधिकारी, छोट-मोठे व्यापारी, खासगी क्षेत्रातील नोकरदार, कलाकार यांना मुंबई, ठाण्यात म्हाडाच्या घरासाठी अर्ज करता येणार नाही. मुंबई, ठाणे, पुणे ही महानगर वगळता उर्वरित महाराष्ट्रासाठी १८ लाखांच्यापुढे उत्पन्न असणाऱ्यांचा समावेश उच्च उत्पन्न गटात करण्यात आला आहे.

वाचा- करोनाअनाथावर पहिला हक्क कोणत्या आजी-आजोबांचा?; सर्वोच्च न्यायालयाने दिला निर्णय

मुंबई,ठाणे (कोकण मंडळ), पुणे या महानगरात उच्च उत्पन्न गटातील घरांना मोठी मागणी आहे. म्हाडाकडून सध्या अनेक पुनर्विकास प्रकल्प राबवले जत असून येत्या काही काळात उच्च उत्पन्न गटासाठी मोठ्या प्रमाणात घरे उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मात्र ज्यांचे वार्षिक उत्पन्न १८ लाखांहून अधिक आहे ते अर्ज करू शकणार नाहीत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.