मुंबई: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) या मालिकेचा ‘विवाह स्पेशल’ एपिसोड १२ जून २०२२ रोजी दाखवण्यात येणार होता. मात्र हा एपिसोड प्रदर्शित करण्यादरम्यान गडबड झाल्याने प्रेक्षकांचा हिरमोड झाला आहे. परिणामी ‘झी मराठी’ वाहिनीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन जाहीर माफी मागितली आहे.

नेमकं काय घडलं?
नेहा-यशच्या लग्नसोहळ्याचा एपिसोड पाहण्यासाठी प्रेक्षकवर्ग नक्कीच उत्सुक होता. नेहा कामत आणि यशवर्धन चौधरी १२ जून रोजी विवाहबंधनामध्ये अडकणार असा हा एपिसोड होता. तसं झालं देखील पण काहीशा गोंधळामुळे हा विवाह विशेष भागामध्ये व्यत्यय आला. प्रेक्षकांनी सोशल मीडियावर केलेल्या कमेंट्सनुसार जवळपास अर्धा तास प्रेक्षकांना चॅनेलवर केवळ जाहिरात दिसत होती. त्यामुळे बराचसा एपिसोड पाहता न आल्याची तक्रार त्यांनी केली आहे.

हे वाचा-लंडनमध्ये या व्यक्तीसह धमाल करतेय अजय देवगणची लेक न्यासा

झी मराठीने मागितली माफी
Zee5 या झी च्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेचा स्पेशल एपिसोड १ तास २५ मिनिटांचा दिसत आहे. दरम्यान ज्या प्रेक्षकांना ‘माझी तुझी रेशीमगाठ विवाह विशेष’ भाग टीव्हीवर पाहायचा आहे त्यांना १३ जून रोजी पाहता येणार आहे. झी मराठी चॅनेलने केलेल्या पोस्टमध्ये ही माहिती दिली आहे. त्यांनी प्रेक्षकांची माफी देखील मागितली आहे. त्यांनी या पोस्टमध्ये असं म्हटलं आहे की, ‘काही तांत्रिक अडचणींमुळे माझी तुझी रेशीमगाठच्या आजच्या विवाह विशेष भागात व्यत्यय आला. त्याबद्दल क्षमस्व. पण तुम्हा रसिकांसाठी हाच आनंद सोहळा आम्ही आज (१३ जून) रोजी सकाळी १०. वा. आणि दुपारी ४ वा. पुन्हा दाखवणार आहोत. त्यामुळे पाहायला विसरू नका. नेहा आणि यशच्या लग्नाचा आनंद सोहळा फक्त झी मराठीवर.’ अशाप्रकारे प्रेक्षकांची गैरसोय झाल्याने झी मराठीने माफी मागितली आहे.

झी मराठीकडून शेअर करण्यात आलेली ही पोस्ट या मालिकेतील कलाकारांनी देखील त्यांच्या वैयक्तिक इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे, मायरा वायकूळ, अभिनेता श्रेयस तळपदे यांनी ही पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. दरम्यान ही मालिका लग्नविधींच्या एपिसोड्सदरम्यान प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवत होती. सोशल मीडियावर या मालिकेचे व्हिडिओ गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. त्या दरम्यान असा गोंधळ झाल्याने याचा फटका मालिकेच्या टीआरपी रेटिंगला बसेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

हे वाचा-या थ्रोबॅक फोटोतील मराठमोळ्या हिरोला ओळखलं का? हिंदीमध्येही आहे लोकप्रिय चेहरा

याआधी नेहा कामत आणि यशवर्धन चौधरीच्या लग्नाचे विविध व्हिडिओ झी मराठीकडून पोस्ट करण्यात आले आहेत. ज्यामध्ये संपूर्ण कास्ट धमाल करताना दिसत आहे. नेहाचा लूक, यशची लग्नातील एंट्री, मंगलाष्टकं, पत्रिका इ. सर्वच गोष्टी शाही दाखवण्यात आल्या आहेत. कलाकारांनी तांत्रिक अडचण आल्याने माफी मागिल्यानंतर प्रेक्षकांनी या मालिकेचा पुन्हा दाखवण्यात येणारा भाग पाहणार आहोत अशाही कमेंट केल्या आहेत. त्यामुळे प्रेक्षकवर्ग खरोखरच या लग्नासाठी उत्सुक असल्याचे पाहायला मिळते आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.