नवी दिल्ली: BSNL Rs 2022 Prepaid Plan: सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) आपल्या प्रतिस्पर्धी कंपन्या जिओ, एअरटेल आणि वीआयला टक्कर देण्यासाठी सातत्याने नवीन प्लान्स आणत असते. बीएसएनएलकडून ग्राहकांसाठी खास ऑफर्सची घोषणा देखील केले जाते. आता कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी एक नवीन प्रीपेड प्लान लाँच केला आहे. हा प्लान वर्क फ्रॉम होम करणाऱ्या यूजर्ससाठी बेस्ट आहे. या प्लान अंतर्गत यूजर्सला दरमहिन्याला ७५ जीबी डेटा मिळेल. ज्या यूजर्सला जास्त डेटाची गरज असते, अशांसाठी हा प्लान फायद्याचा ठरेल. प्लानमध्ये यूजर्सला लाँग व्हॅलिडिटी देखील मिळते. BSNL च्या या प्लानची किंमत २०२२ रुपये आहे. या प्रीपेड प्लानविषयी सविस्तर जाणून घेऊया.

वाचा: अवघ्या २६४ रुपयात तुमचा होईल iPhone सारखा दिसणारा ‘हा’ स्मार्टफोन, बँक-एक्सचेंज ऑफरचा मिळेल फायदा

BSNL चा २०२२ रुपयांचा प्लान

BSNL आपल्या २०२२ रुपयांच्या नवीन प्रीपेड प्लानमध्ये जबरदस्त बेनिफिट्स देत आहे. या प्लानमध्ये यूजर्सला दर महिन्याला ७५ जीबी डेटा मिळेल. या प्रीपेड प्लानची वैधता ३०० दिवस आहे. प्लानमध्ये देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंगचा फायदा मिळेल. याशिवाय, दररोज १०० मोफत एसएमएस देखील मिळतात. दरमहिन्याला मिळणारा ७५ जीबी डेटा समाप्त झाल्यास तुम्ही ४० Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरू शकता.

वाचा: अवघ्या १९ मिनिटात फुल चार्ज होणारा OnePlus चा सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन भारतात लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स

मात्र, लक्षात घ्या डेटाचा फायदा केवळ सुरुवातीच्या ६० दिवस मिळतो. त्यानंतर इंटरनेट वापरण्यासाठी तुम्हाला डेटा वाउचरसह रिचार्ज करावा लागेल. BSNL ने या प्रीपेड रिचार्ज प्लान्सला खास ‘आझादी का अमृत महोत्सव’ निमित्ताने लाँच केले आहे. ही ऑफर फक्त ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंतच उपलब्ध आहे. त्यामुळे तुम्हाला जर या वाउचरचा फायदा घ्यायचा असल्यास याच महिन्यात रिचार्ज करावा लागेल. दरम्यान, बीएसएनएल सध्या केवळ ३जी सर्विस ऑफर करत आहे. लवकरच कंपनी देशभरात ४जी नेटवर्क लाँच करण्याची शक्यता आहे.

वाचा: मस्तच! Nothing स्वस्त स्मार्टफोन लाँच करण्याची शक्यता, किंमत २५ हजारांच्या बजेटमध्ये; पाहा डिटेल्सSource link

Leave a Reply

Your email address will not be published.