Weight Loss and Reduce Belly Fat Naturally : आजच्या काळात प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे आहे. पण काही वेळा चुकीच्या जीवनशैलीमुळे शरीराचा शेप बिघडतो. खाण्यापिण्याच्या सवयींमुळे सामान्यतः वजन वाढते. अशाच काही सवयींमुळे मुंबईतील लोणावळा येथील रहिवासी बाळू कोंडीबा मरगळे यांचे वजन 77 किलोपर्यंत वाढले होते. जेव्हा आवडते कपडेही फिट बसत नव्हते आणि खूप सुस्त वाटू लागलं तेव्हा त्याने वजन कमी करण्याचा निर्णय घेतला. एका मित्राच्या वेटलॉस स्टोरीतून प्रेरित होऊन त्याने सकस आहार घेण्यास सुरुवात केली. या काळात बाळूने आहाराशी प्रामाणिक राहून अवघ्या 5 महिन्यांत 20 किलो वजन कमी केले. चला तर मग जाणून घेऊया त्याने स्वतःमध्ये हा बदल कसा घडवला.

 • नाव – बाळू कोंडीबा मरगळे
 • व्यवसाय – नोकरी
 • वय – 29 वर्षे
 • उंची – 5.5 फूट
 • शहर – लोणावळा
 • सर्वात जास्त वाढलेले वजन – 77 किलो
 • कमी केलेले वजन – 20 किलो
 • वजन कमी करण्यासाठी लागलेला वेळ – 5 महिने

(Image Credit: NBT)

टर्निंग पॉइंट कसा आला?

बाळू सांगतो की, काही वेळापूर्वी माझा मित्र जाहिदने वजन कमी केले. त्याच्या वेटलॉस स्टोरीने मला प्रेरित केले. मग मी रेजिस्टेंट डाएटसोबत डेली वर्कआउट करायला सुरुवात केली. कोविडमधील लॉकडाऊनमध्ये मी 2 ते अडीच तास घरात राहून वर्कआउट केलं. हा माझ्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट ठरला.

(वाचा :- पोट, कंबर, मांड्यावरील चरबी झपाट्याने जाईल साखरेसारखी विरघळून, हा 1 पदार्थ या 5 पद्धतींनी खा, लगेच मिळेल रिझल्ट)

डाएट

100 ग्रॅम ओटमील आणि ग्रीन टी

 • दुपारचे जेवण –

2 मूग डाळीचं धिरडं किंवा 2 मल्टीग्रेन पिठाच्या चपात्या, 30 ते 40 ग्रॅम टोफू पनीरसोबत हिरव्या भाज्या

 • रात्रीचे जेवण –

2 मल्टीग्रेन पिठाच्या चपात्या, 30 ते 40 ग्रॅम टोफूसोबत हिरव्या भाज्या, डाळ आणि 100 ग्रॅम ब्राऊन राइस

 • प्री-वर्कआउट मील –

100 ग्रॅम ओट्स मील आणि ग्रीन टी

 • पोस्ट वर्कआउट मील –

स्प्राउट्स आणि 3 उकडलेली एग व्हाईट

 • लो कॅलरी रेसिपी –

बाळूच्या मते, आहार आणि व्यायामाचा समतोल साधून वजन नेहमी कमी करता येते. तुम्हाला तुमचे आवडते अन्नपदार्थ खाणे थांबवण्याची अजिबात गरज नाही पण ते शिस्तबद्ध राहून आणि कमी प्रमाणातच खावे.

(वाचा :- पालकहो मुलांवर संकटाचा डोंगर, टोमॅटो फिवरनंतर मुलांसाठी धोक्याची घंटा बनला HFMD रोग, ही 3 लक्षणं दिसताच डॉक्टरकडे जा)

वर्कआउट रूटीन

बाळूच्या म्हणण्यानुसार त्याने वजन कमी करण्यासाठी त्याच्या वर्कआऊटमध्ये फक्त जंपिंग जॅक, स्किपिंग रोप, स्क्वॅट्सचाच समावेश केला नाही तर त्याला एकाच जागी उभे राहून धावण्याचा सुद्धा खूप फायदा झाला.

(वाचा :- Kidney Health : रोजच्या ‘या’ 5 गोष्टींमुळे किडनी सडते व बनते कच-याचे घर, किडनीच्या सुरक्षेसाठी 10 हात दूर राहा)

मोटिव्हेट कशी राहिली?

बाळू म्हणतो की, जेव्हापासून माझे वजन कमी झाले आहे, तेव्हापासून मी नवीन आयुष्याचा आनंद घेत आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी जसा दिसतो तसा मला आवडतो. हे मला सतत प्रेरित राहण्याची आठवण करून देते आणि जेव्हाही मी मार्ग भरकटतो तेव्हा मी माझे भूतकाळातील फोटो पाहतो, जे मला नेहमी पुढे जाण्यास प्रेरित करतात.

(वाचा :- रात्रीच्या जेवणात हे 5 पदार्थ खात असाल तर मरणाच्या दारात आहे तुमचं शरीर, आयुर्वेदिक डॉक्टरांचा धोक्याचा इशारा)

फिटनेस सीक्रेट

बाळू सांगतो की, तुमचा आहार आणि व्यायाम नियमित ठेवल्याने वजन कमी करण्याची प्रक्रिया सुलभ होते. याशिवाय, चीट डे ला तुमच्या फिटनेस रूटीनचा एक भाग बनवा. यामुळे प्रेरित राहण्यास खूप मदत होते.

(वाचा :- करोना व मंकीपॉक्ससोबतच ‘हे’ 5 भयंकर आजार ठरतायत WHO साठी डोकेदुखी, ‘या’ 10 कॉमन लक्षणांवर ठेवा बारीक नजर..!)

ओव्हरवेट असल्याने कोणत्या समस्या आल्या?

आधी वजन जास्त असल्याने मला माझ्या आवडीचे कपडे घालता येत नव्हते. याशिवाय मी खूप सुस्त झालो आणि तासनतास झोपायचो. बाळू म्हणतो, आधी मी माझ्या खाण्याच्या सवयी बदलल्या. तळलेले पदार्थ खाणे टाळले आणि अधिकाधिक कार्ब्सचे सेवन केले.

(वाचा :- वयाच्या 60ठी नंतरही होणार नाहीत गुडघे व सांध्यांमध्ये अजिबात वेदना, मजबूत हाडांसाठी आजपासूनच सुरू करा ‘ही’ 5 कामे)

वेटलॉसमधून काय शिकवण मिळाली?

बाळूच्या मते, आपण नेहमी नैसर्गिक पद्धतीने वजन कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. वजन कमी करणे हा प्रवास आहे, स्पर्धा नाही. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी पुरेसा वेळ द्या. वजन कमी करण्याचे कोणतेही अल्पकालीन उद्दिष्ट असू नये. जसे की मला लग्नासाठी वजन कमी करायचे आहे. आपल्या आरोग्यासाठी आणि समाधानासाठी वजन कमी करा.

(वाचा :- Head Neck Cancer symptoms : धोक्याची घंटा, ‘ही’ 6 लक्षणं दिसल्यास सावधान..! असू शकतो मान किंवा डोक्याचा कॅन्सर)

टीप : बाळूसाठी ज्या गोष्टी कामी आल्या ते सर्वच तुमच्यासाठीही येईलच असं मुळीच नाही. त्यामुळे या लेखात नमूद केलेल्या डाएट व वर्कआउटचे अंधपणे पालन करणे टाळा आणि तुमच्या शरीरासाठी ज्या गोष्टी सुट होतील त्याच करा किंवा एकदा डाएटिशियन व डॉक्टरांचा सल्ला घ्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.