मुंबई : नुपुर शर्माच्या मोहम्मद पैगंबर यांच्यावरच्या वक्तव्यानं झालेला गदारोळ अजून थांबलेला नाही. तेवढ्यात सोशल मीडियावर एका पाकिस्तानी अभिनेत्यानं वादग्रस्त विधान केलं आहे. ते व्हायरल होत आहे. हे वक्तव्य पाकिस्तानी सिनेमा आणि टीव्ही अभिनेता हमजा अली अब्बासी यानं केलं आहे.

लेकाला रडताना पाहून भारती सिंगला आलं रडू, नेमकं झालं तरी काय?

Hamza Ali Abbasi आता सिताऱ्यांच्या दुनियेपासून दूर आहे. त्यानं इस्लामिक पद्धतीनं आयुष्य जगायचा निर्णय घेतला आहे. हा एक मोठा निर्णय मानला जातो. पण त्याच्यासारखे अनेक पाकिस्तानी कलाकार असं जीवन स्वखुशीनं जगतात.

हमजा अली सध्या सोशल मीडियावर इस्लामिक धर्म आणि त्यातल्या चांगल्या गोष्टींचा प्रचार करत असतो. सध्या त्यानं केलेलं ट्वीट व्हायरल होत आहे. त्यात त्यानं यीशु मसीह यांचा मृत्यू झाल्याचं म्हटलंय. हमजानं या पोस्टमध्ये लिहिलं आहे, यीशु मसीह मरण पावलेत. इमाम मेहदीचं आगमन आता कधीच होणार नाही. त्यानं लिहिलं आहे, पैगंबर मोहम्मद हे शेवटचे दूत होते.

Video: सारा अली खानला पाहिल्यावर कार्तिकने मारली घट्ट मिठी

सोशल मीडियावर हमजाच्या या वक्तव्यावर प्रचंड टीका होत आहे. नेटकरी खूप वाईटसाईच बोलत आहेत. ते सांगतायत, तुझं ज्ञान वाढव. आपला मूर्खपणा बंद कर. एकानं लिहिलंय, गुगुलवरून माहिती मिळवली की असंच होत असतं.

हमजा पाकिस्तानी फिल्म इंडस्ट्रीत होता. तो लोकप्रिय आहे. त्यानं २००६ मध्ये करियरची सुरुवात केली. हमजानं प्यारे अफसानेमध्ये अफजल ही व्यक्तिरेखा उभी केली होती. त्यामुळेच तो घराघरात पोहोचला.

आधी दौलतरावची पोस्ट करत नात्याचा खुलासा; अन् आता सईला करायचं ‘ब्रेकअप’Source link

Leave a Reply

Your email address will not be published.