मुंबई: राज्यसभेच्या सहा जागांसाठीच्या निवडणुकीत काँग्रेसने दिलेला अमराठी उमेदवार इम्रान प्रतापगढी यांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. त्यांना पहिल्या फेरीत ४४ मतं पडली आहेत. काँग्रेसने अंतर्गत नाराजगी झुगारुन इम्रान प्रतापगढी यांना महाराष्ट्रातून राज्यसभेचं तिकीट दिलं होतं. त्यासाठी काँग्रेसने तगडी फिल्डिंगही लावली होती. काँग्रेसच्या सर्व प्रयत्नांना यश आलं असून इम्रान प्रतापगढी हे पहिल्या फेरीत विजयी झाले आहेत.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी सायंकाळी ४ वाजेपर्यंत सर्वपक्षीय २८५ आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. त्यानंतर संध्याकाळी ५ वाजता मतमोजणीला सुरूवात होऊन दोन तासात निकाल हाती येणार होता. मात्र, भाजप आणि शिवसेनेने एकमेकांच्या मतांवर आक्षेप घेतला आणि सर्व गोंधळ उडाला. त्यानंतर हे प्रकरण निवडणूक आयोगाकडे गेलं, निवडणूक आयोगाने शनिवारी मध्यत्रीनंतर १ वाजता मतमोजणी करण्याचे आदेश दिले. त्यामध्ये इम्रान प्रतापगढी यांनी धुरळा उडवून देत पहिल्याच फेरीत बाजी मारली. त्यांना पहिल्याच फेरीत पहिल्या पसंतीची ४४ मतं पडली.

हेही वाचा –भाजपचे धनंजय महाडिक विजयी, आमदार फोडण्यात यश, संजय पवार पराभूत

उर्दू भाषिक कवी इम्रान प्रतापगढी हे उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे तरुण नेते आहेत. त्यांना काँग्रेसने महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे काँग्रेसने अंतर्गत नाराजी झुगारुन त्यांना उमेदवारी दिली. त्यानंतर काँग्रेस नेत्या नगमा यांनीही नाराजी व्यक्त केली. तर विदर्भातील महत्त्वाचे काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी सरचिटणीस पदाचा राजीनामा दिला.

महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणारे इम्रान प्रतापगढी कोण आहेत?

मोहम्मद इम्रान प्रतापगढी हे उर्दू भाषिक कवी आहेत. ते उत्तर प्रदेशमधील काँग्रेसचे नेते आहेत. भारत आणि जगाच्या इतर भागांतील मुस्लिम अनुभव आणि अस्मिता यांचे वर्णन करणार्‍या निषेधात्मक काव्यासाठी इम्रान प्रतापगढी ओळखले जातात. ते विशेषतः “मदरसा” आणि “हाँ मै कश्मीर हूं” या उर्दू नझ्मसाठी लोकप्रिय आहेत.

हेही वाचा –सहाव्या जागेवरील नाट्यमय लढतीत भाजपचा विजय; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

इम्रान प्रतापगढी हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मुरादाबाद मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. मात्र त्यांचा दणकून पराभव झाला होता. समाजवादी पक्षाचे उमेदवार ६ लाख ४९ हजार ५३८ मतांनी विजयी झाले, मात्र प्रतापगढी तिसऱ्या क्रमाकांवर फेकले गेले. त्यांना केवळ ५९ हजार १९८ मतांवर समाधान मानावे लागले. त्यानंतर ३ जून २०२१ रोजी अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अल्पसंख्याक विभागाच्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. प्रतापगढी हे काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात. लोकसभेतील पराभवानंतर राज्यसभेवर प्रतापगढींचं पुनर्वसन होताना दिसत आहे.

हेही वाचा – संजय राऊतांचा चौकार, प्रफुल पटेल, पियूष गोयल, अनिल बोंडे इमरान प्रतापगढींचा विजय

इम्रान प्रतापगढी यांचा जन्म ६ ऑगस्ट १९८७ रोजी उत्तर प्रदेशमधील प्रतापगढ येथे झाला होता. त्यांनी अलाहाबाद विद्यापीठातून हिंदी साहित्यात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी त्यांनी हिंदी कविता लिहित अनेक कवी संमेलनं गाजवली. २००८ मध्ये ते मुशायरांमध्ये सहभागी झाले. त्यांची मदरसा ही नझम लोकप्रिय झाली.

1998 ची राज्यसभा निवडणूक, ज्यात पवारांनीच काँग्रेस उमेदवाराचा करेक्ट कार्यक्रम केला होताSource link

Leave a Reply

Your email address will not be published.