मुंबई :रंग माझा वेगळा मालिकेत सध्या खूप काही घडतंय. दीपिकाचा ताबा मिळावा, म्हणून दीपा कोर्टात गेली आहे. सौंदर्या अगोदर दीपाला दिलासा देते की मी कोर्टात खरं काय ते सांगेन. हा माझा शब्द आहे. त्यामुळे दीपा निर्धास्त असते. पण कोर्टात काही वेगळंच घडतं.

दीपिका आणि कार्तिकीला किडनॅप केलं जातं. सौंदर्याला ब्लॅकमेल करतात. त्यामुळे तिला कोर्टात खोटी साक्ष द्यावी लागतेय. आता समोर व्हिडिओ आला आहे तो पुढच्या भागाचा. त्यात घरी आल्यावर कार्तिकला आयेशानं दीपिकाला पळवून सौंदर्याला खोटं बोलायला भाग पाडल्याचं कळतं. तो भयंकर भडकतो.

बिकिनीमधल्या उर्वशी ढोलकियाचा पाण्यातला जलवा, Photo वर लाइक्सचा वर्षाव!

इकडे सौंदर्या दीपाकडे येते. तिनं खोटी साक्ष का दिली, हे सांगायचं असतं. पण दीपा दार उघडून काही ऐकून घेत नाही. ती आपल्या सासूवर संतापते. त्या भरात ती तिला घरातून हकलते. आता सत्य कसं आणि कधी समोर येणार, याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

रंग माझा वेगळा मालिका अनेक दिवस टीआरपीमध्ये नंबर एकची मालिका आहे. २३ आठवड्याहून जास्त ही मालिका पहिल्या नंबरवर आहे. अगदी कार्तिकीची भूमिका करत असलेली सायेशा ही मालिका सोडून गेली. तिच्या जागी दुसरी आली, तरीही टीआरपी रेटिंग तेच राहिलंय. सायेशा आता नवा गडी नवं राज्य मालिकेत दिसणार आहे.

Photo:राजकुमार रावनं खरेदी केलं जान्हवी कपूरचं आलिशान अपार्टमेंट, किंमत ऐ

रंग माझा वेगळा ही मालिका दीपा आणि कार्तिकच्या नात्यावर बेतली आहे. सुरुवातीपासूनच या मालिकेचं कथानक आणि मांडणी प्रेक्षकांना भावली. दीपा आणि कार्तिकचं नातं मान्य नसलेल्या सौंदर्या इनामदारने या दोघांना वेगळं करण्यासाठी अनेक कट केले. एका वळणावर दीपा आणि कार्तिक वेगळे झाले. दीपाने खरं तर दोन मुलींना जन्म दिला होता, पण सौंदर्याने दीपिकाला हॉस्पिटलमधून पळवून नेलं आणि दत्तक घेतल्याचा बनाव केला. आता हे सत्य दीपाला समजलं आहे आणि सौंदर्याचा खोटेपणाही समोर आला आहे. सौंदर्याविरोधात लढण्यासाठी दीपा उभी राहिली आहे.

सुबोध भावे दिसणार नव्या भूमिकेत, सेलिब्रिटी महिलांचा उलगडणार प्रवासSource link

Leave a Reply

Your email address will not be published.