बालकलाकार साईशा भोईर ‘कार्तिकी’ (Kartiki Saisha Bhoir) ही भूमिका साकारते. साईशा ही मालिका सोडत असल्याचे सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आले आहे. साईशा भोईर सोशल मीडियावरही चर्चेत आहे. ती विविध रील्स सोशल मीडियावर पोस्ट करत असते. ती या मालिकेत येण्यापूर्वीच सोशल मीडियावर स्टार होती. ‘चिंटुकली साईशा’ (Saisha Bhoir Instagram) म्हणून ती इस्टाग्रामवर प्रसिद्ध आहे.
बालकलाकार साईशा आता (Saisha Bhoir to Quit Rang Majha Vegla) ही मालिका सोडत असल्याचे समजते आहे. तिने स्वत: इन्स्टा स्टोरीमध्ये याबाबत एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिला नवा सिनेमा मिळाल्याने ती ही मालिका सोडत असल्याचे समोर आले असून आता कार्तिकीची भूमिका कोण साकारणार हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.
हे वाचा-ठरलं! ‘तारक मेहता..मध्ये’ दिशा वकानी नव्हे तर ही अभिनेत्री असणार नवीन दयाबेन
त्याचप्रमाणे साईशा कोणत्या नव्या प्रोजेक्टमध्ये दिसणार यासाठी देखील प्रेक्षक उत्सुक आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या पोस्टवर चाहते मात्र नाराजी व्यक्त करत आहेत. ‘तिने का सोडली मालिका?’, ‘तिच्याशिवाय मज्जाच नाही’, अशा कमेंट्स चाहत्याांनी केल्या आहेत. तर काहींनी अशा कमेंट केल्या आहेत की, मालिकेच्या रटाळ कथानकामुळे तिने मालिका सोडली आहे.
हे वाचा-Video: सारा अली खानला पाहिल्यावर कार्तिकने मारली घट्ट मिठी
रंग माझा वेगळा या मालिकेबाबत बोलायचं झालं तर या आठवड्यामध्ये देखील ही मालिका टीआरपी रेटिंगमध्ये पहिल्या क्रमाकांवर कायम आहे. स्टार प्रवाहच्या या मालिकेचा टीआरपी ६.८ आहे. आता कार्तिकी अर्थात साईशाने ही मालिका सोडल्यानंतर टीआरपीमध्ये काही बदल होतो का, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.
अडथळ्यांचा सामना करत कीर्तीचं स्वप्न झालं पूर्ण