मुंबई : अभिनेता रणवीर सिंगच्या न्यूड फोटोशूटनंतर एकच गहजब झाला. अनेकांनी त्याच्यावर टीकाच केली. पेपर या परदेशी मॅगझिनसाठी हे फोटोशूट केलं होतं. खरं तर दीपिकानंही या शूटचं कौतुकच केलं. अर्थात, फॅन्सना धक्का बसलाय. टीका आणि कौतुक दोन्हींचा भडिमार अभिनेत्यावर झाला. दिग्दर्शक आण अभिनेता आदिनाथ कोठारेनंही आपलं मत व्यक्त केलं आहे.

अभी घर सोडून गेल्यानंतर कांचन अरुंधतीलाच सुनावते, पुढच्या भागाचा Video व्हायरल

आदिनाथ आणि रणवीरनं ’83’ या सिनेमात एकत्र काम केलं आहे. रणवीरच्या या फोटोबद्दल अभिनेता म्हणाला, ‘मी रणवीर सिंगचा चाहता आहे. तो जे काही करतो ते नेहमीच प्रेरणादायी असतं. तो जे काही करतो, त्यामागे खूप काही विचार असतो.’

आदिनाथ पुढे म्हणतो, ‘या फोटोवरून तो ट्रोल का होत आहे, ते मला काही कळत नाहीय. त्यानं ज्या पद्धतीनं हे फोटोशूट केलं, स्वत:ला कॅरी केलं ते खरोखर कौतुकास्पद आहे. प्रेरणा देणारं आहे. त्याच्यावर टीका करणाऱ्यांची संख्या कमी आहे. उलट कौतुक करणारे जास्त आहेत. फिल्म इंडस्ट्रीतला रणवीर हा एक उत्तम अभिनेता आहेच. शिवाय त्याच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे.’

आदिनाथ कोठारे आपल्या कामाची छाप पाडत असतोच. चंद्रमुखी सिनेमा रिलीज झाला आणि सुपर डुपर हिट ठरला. चंद्राचा राजकारणी प्रियकर दौलतराव देशमानेही तितकाच लोकप्रिय झाला. खूप गॅपनंतर आदिनाथ कोठारेनं मराठी सिनेमा केला. काही वर्षांपूर्वी त्यानं पाणी हा सिनेमा दिग्दर्शित केला आणि त्याला पुरस्कारही मिळाले. आता अजून तो बरंच काही करणार आहे.

लग्नानंतरही कधीच आई झाली नाही ही अभिनेत्री, स्वत:च सांगितलं होतं कारण

महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनशी बोलताना आदिनाथ कोठारे म्हणाला, ‘मी एका मराठी सिनेमाची निर्मिती करणार आहे. पण अजून बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या मी काही दिवसांनी सांगेन.’ आदिनाथच्या समोर आता भरपूर वेगवेगळं काम आहे. या आपल्या कामाबद्दलचीच माहिती तो त्याच्या युट्यूब चॅनेलवर देणार आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप, समलैंगिकतेला मान्यता मग हिजाबला का नाही? | अबू आझमीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.