वृत्तसंस्था, नवी दिल्लीः रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने पार्क केलेल्या वाहनाचा फोटो एखाद्या व्यक्तीने पाठवला, तर त्या व्यक्तीला ५०० रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. सरकार लवकरच असा कायदा आणणार आहे. दुसरीकडे चुकीच्या पद्धतीने पार्किंग करणाऱ्या वाहनधारकाला एक हजार रुपये दंड भरावा लागणार आहे.

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी ही माहिती दिली. येथे एका कार्यक्रमात मार्गदर्शन करताना गडकरी म्हणाले की, रस्त्यावर चुकीच्या पद्धतीने वाहने पार्क करण्याच्या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी कायदा आणण्याचा विचार करत आहोत.

‘मी एक असा कायदा आणणार आहे, ज्यामुळे रस्त्यावर पार्क केलेल्या वाहनाचे जी व्यक्ती मोबाइलमधून फोटो काढून पाठवेल आणि त्यामुळे वाहनधारकाला हजार रुपये दंड झाला, तर त्या फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीला ५०० रुपये मिळणार आहेत. यामुळे पार्किंगची समस्या दूर होऊ शकेल,’ असे गडकरी म्हणाले. लोक त्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा बनवण्याऐवजी ते आपली वाहने रस्त्यावर उभी करतात, याबद्दल गडकरी यांनी खेद व्यक्त केला.

वाचाः
सायकलस्वाराला धडकून बिबट्याच दचकला, मग पोरगाही धूम ठोकून पळाला

‘माझ्या नागपुरातील स्वयंपाक्याकडेही दोन सेकंड हँड वाहने आहेत. सध्याच्या घडीला चार जणांच्या कुटुंबाकडे सहा गाड्या आहेत. दिल्लीचे लोक भाग्यवान आहेत असे दिसते. त्यांची वाहने उभी करण्यासाठी आम्ही रस्ता बनवला आहे,’ असे गडकरी यांनी गंमतीच्या स्वरात म्हणाले.

वाचाः एकेकाळी म्हणेल तो शब्द अंतिम होता, पण आता मोदी चंद्राबाबूंना भेटीची वेळही का देत नाहीत?Source link

Leave a Reply

Your email address will not be published.