मुंबई : बिग बाॅसच्या प्रत्येक सीझनमध्ये सगळ्यांची करमणूक करणारी राखी सावंत अलिकडे व्यावसायिक आदिल खान दुर्रानीला डेट करतेय. दोघांना अनेकदा एकत्र पाहिलं आहे. राखी जिथे जाते, तिथे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असते. आता तर यात आदिलही तिला कंपनी देतोय. आता तर कहरच झाला. राखीनं भर रस्त्यात चक्क नागिन डान्स केला.

रॉकी और रानी की प्रेम कहानीत दिसणार मराठमोळी अभिनेत्री

राखीचा नागिन डान्स
सध्या सोशल मीडियावर राखी सावंतचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यात राखी आणि आदिल फोटोग्राफर्सची बोलतायत. अचानक अभिनेत्री नागिन डान्स सुरू करते. ती गाणं म्हणतेही. हा माझा नाग आहे, आणि मी त्याची नागिन, असं सांगत ती नागिन डान्स सुरू करते. या व्हिडिओत आदिल मात्र लांब पळताना दिसतोय.

राखीला दुबईत मिळाली पदवी
“मी MBA झाले आहे. MBA करून मी डॉक्टर झाले आहे. आता मी अर्जुन बाजवाचं ऑपरेशन करणार. त्याचे सर्व अववय काढून त्यांना स्वच्छ करणार. माझ्यासमोर मुन्नाभाई MBBS सुद्ध फेल आहे.” असं राखी एका व्हिडिओमध्ये सांगतेय. दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेल्या दादा साहेब फाळके आयकॉन पुरस्कारानं राखीला गैरवण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात मिळालेलं प्रमाणपत्र दाखवून आता मी MBA डॉक्टर झाली आहे असा दावा राखी करतेय. तिचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला होता. नेटकरी देखील त्यावर गंमतीशीर प्रतिक्रिया देत होते.

राखीनं केली वाहतूक कोंडी
मध्यंतरी राखीने तिची कार रस्त्यावर उभी केल्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावर लोकांनी तिला खूप सुनावलं. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की राखीने तिची कार रस्त्याच्या मधोमध उभी केली आहे. ज्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. तिच्या कारच्या मागे वाहनांची मोठी रांग लागली आहे. ही कोंडी पाहून राखी म्हणाली “जहां हम खडे होते हैं, लाइन वहीं से शुरू होती है. रुक जाओ.” एवढं बोलून ती कारमध्ये बसून निघून गेली.

‘आमिर खानमुळेच माझ्या मुलीच्या हातून हिट सिनेमा निसटला’

सुबोध भावे दिसणार नव्या भूमिकेत, सेलिब्रिटी महिलांचा उलगडणार प्रवासSource link

Leave a Reply

Your email address will not be published.