मुंबई : अभिनेत्री राखी सावंत रोजच काही ना काही कारणानं चर्चेत असते. तिचा बाॅयफ्रेंड आदिल खान दुर्रानीबरोबर ती नेहमीच दिसत असते. मीडियाशी पण गप्पा मारत असते. काही दिवसांपूर्वी आदिलची गर्लफ्रेंड रोशिना देलावरी तिला ब्लॅकमेल करतेय, आत्महत्या करण्याची धमकी देतेय, असं राखी म्हणाली.

रंग माझा वेगळा:दीपानं सौंदर्या इनामदारला घरातून हाकललं, Video पाहून प्रेक्षकांची उत्सुकता वाढली

रोशिना देलावरीनं राखी सावंतचा केला पर्दाफाश
रोशिनानं राखीची एक बाजू सगळ्यांना सांगितली. ती म्हणाली, मी कधीच राखीला ब्लॅकमेल केलेलं नाही. उलट राखीच तिला सारखे फोन करून त्रास देत आहे. त्याचा स्क्रीन शाॅट आदिलच्या एक्स गर्लफ्रेंडनं इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ती म्हणाली, राखी स्वत:च असुरक्षित आहे. ती स्वत:ला तसं समजतेय.

रोशिनीनं शेअर केला स्क्रीन शाॅट

आदिल खानच्या एक्सनं सांगितलं सत्य
रोशिनी देलावरनं लिहिलं आहे, ‘मी जो स्क्रीन शाॅट शेअर केलाय, त्यावरून ते उघड होतंय की राखी सावंत मला फोन आणि मेसेज करत आहे. आदिल जेव्हा म्हैसूरला येतो, तेव्हा राखी मला फोन करून विचारत राहते की आदिल मला भेटायला आलाय का? मी माझं शिक्षण पूर्ण करत आहे. राखी मला फोन करून खूप त्रास देते. मला कंटाळा आला आहे. मी आशा करते, की दोघांचं नातं चांगलं आहे आणि मी त्यात असू नये.’

महेश मांजरेकरांनी ‘बिग बॉस मराठी ४’ चा प्रोमो शेअरच केला नाही

रोशिना देलावरी आहे इराणची
रोशिना इराणी आहे. म्हैसूरला ती वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करतेय. तो पूर्ण झाला की ती आपल्या देशात परत जाणार आहे. ती आदिलला चार वर्ष डेट करत होती. आता त्यांचं ब्रेकअप झालंय. पूर्वी दोघांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर असायचे. आता राखी तिला वारंवार फोन करूनही ती उत्तर देत नाही.

भूमिकेविषयी उत्सुकताSource link

Leave a Reply

Your email address will not be published.