चंदीगड : राजस्थानातील उदयपूरमध्ये काँग्रेसचं तीन दिवस नवचिंतन शिबीर सुरु आहे. दुसरीकडे पंजाबमधील वरिष्ठ काँग्रेस नेते सुनील जाखड यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. सुनील जाखड यांनी फेसबुक लाइव्ह करत पक्ष सोडत असल्याची घोषणा केली आहे. जाखड यांच्यावर अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीनं दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई केली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीपासून सुनील जाखड आणि काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाले होते. फेसबुक लाइव्ह करत सुनील जाखड यांनी गुड बाय काँग्रेस आणि या प्रकारे चिंतन शिबीर घेऊन काही होणार नाही, असं म्हटलं. काँग्रेस पक्षाचं ज्यांनी नुकसान केलं त्यांना नोटीस द्यायला हवी होती, असं वक्तव्य सुनील जाखड यांनी केलं आहे. माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासंदर्भात ट्विट केलं आहे.
ना पोलिसांची भीती, ना शिवसैनिकांचा अडसर; राणा दाम्पत्याने ‘या’ कारणांमुळे दिल्ली गाठली?

चिंतन शिबीर औपचारिकता
सुनील जाखड यांनी फेसबुक लाइव्ह करत काँग्रेसचं उदयपूरमधील शिबीर ही औपचारिकता आहे, असं म्हटलं. काँग्रेसला चिंतन शिबीर नाही तर चिंता शिबीराची गरज आहे. उत्तर प्रदेशात काँग्रेसला ३९० मतदारसंघात दोन हजार मत मिळाली आहेत. गोवा आणि उत्तराखंडमध्ये सरकार विरोधात लाट असूनही पक्षाला विजय मिळवता आला नाही. काँग्रेसला या गोष्टीवर विचार करण्याची गरज आहे. या गोष्टींसाठी पक्ष नेतृत्त्वाला दोष देता येणार नाही, इतर अनेक उणीवा आहेत, असं जाखड म्हणाले आहेत.

राहुल गांधींचं कौतुक, हरीश रावतांवर टीका
सुनील जाखड यांनी यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं कौतुक केलं आहे. राहुल गांधी यांनी हुजरेगिरी करणाऱ्यांपासून सावध राहायला हवं, असं जाखड म्हणाले. याशिवाय यावेळी त्यांनी पंजाब काँग्रेस प्रभारी हरीश रावत आणि अंबिका सोनी यांच्यावर टीका केली.

अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या शिस्तपालन समितीनं सुनील जाखड यांच्यावर दोन वर्षांसाठी निलंबनाची कारवाई २६ एप्रिलला केली होती. जाखड यांनी माजी मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी यांच्यावर टीका केली होती. पंजाबमधील विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या पराभवाला चरणजीतसिंह चन्नी जबाबदार असल्याची टीका केली होती.
‘मी जर पूर्वीचा जितेंद्र आव्हाड असतो तर…’, केतकीच्या पोस्टनंतर आव्हाडांची संतप्त प्रतिक्रिया
माजी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी ट्वीट करत काँग्रेसनं सुनील जाखड यांना गमावयला नको. काही मतभेद असतील तर ते चर्चा करुन सोडवता येतील, असं सिद्धू म्हणाले.

‘पवारांवरील टीका म्हणजे विकृती’; केतकी चितळेच्या पोस्टवरुन जितेंद्र आव्हाड बरसले!Source link

Leave a Reply

Your email address will not be published.