मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत मुंबईतील अंधेरी येथील चौकाचं नामकरण करण्यात आलं. राज्यपाल कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी जे.पी. रोड, अंधेरी (प) मुंबई येथील स्थानिक चौकाला दिवंगत श्रीमती शांतीदेवी चंपालालजी कोठारी यांचे नाव देण्यात आले. या कार्यक्रमाची कोनशिला उभारण्यात आली. या कार्यक्रमातील कोनशिलेवर भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नावापुढे कॅबिनेट मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या नावापुढं मंत्रिपदाचा उल्लेख केल्यानं सोशल मीडियावर उलट सुलट चर्चा सुरु आहेत.

सुधीर मुनंगटीवार यांच्या नावापुढं काय लिहिलंय?
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार हे काल अंधेरीत झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नव्हते. मात्र, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उभारण्यात आलेल्या मराठी आणि इंग्रजी कोनशिलेवर सुधीर मुनंगटीवार यांच्या नावापुढं कॅबिनेट मंत्री महाराष्ट्र राज्य असा उल्लेख केला आहे.

नाशिकला जाऊन मुख्यमंत्र्यांची गुडन्यूज, मालेगाव जिल्ह्याबाबत मोठं वक्तव्य, दादा भुसे खूश

सोशल मीडियावर चर्चांना उधाण
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यामुळं कालचा कार्यक्रम अगोदरच चर्चेत आला होता. राज्यपालांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल्या कोनशिलेवर भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या नावापुढं कॅबिनेट मंत्री असा उल्लेख करण्यात आला आहे. कोनशिलेवर कालची तारीख देखील आहे. त्यामुळं नेटकऱ्यांनी सुधीर मुनंगटीवार यांचा शपथविधी कधी झाला, असा सवाल केला आहे. तर, काही जणांनी सुधीर मुनंगटीवार यांचा मंत्रिमंडळात समावेश होणार असल्याचं म्हटलंय. ३० जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला होता. तेव्हापासून राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे.

बापाची पानाची टपरी, घरी अठरा विश्व दारिद्र्य, भारताची ‘चांदी’, पानवाल्याच्या पोराला रौप्यपदक

राज्यपाल कालच्या कार्यक्रमात काय म्हणाले होते?

कधी कधी लोकांना मी सांगतो, महाराष्ट्रामध्ये विशेषता मुंबई आणि ठाणे मधून गुजराती आणि राजस्थानी लोकांना इथून काढल्यास तुमच्याकडे पैसे राहणार नाहीत.मुंबईला आर्थिक राजधानी म्हटलं जातं ते आर्थिक राजधानी म्हटलं जाणार नाही, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी म्हणाले. अंधेरी येथील चौकाच्या नामकरण सोहळ्याला खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, नितेश राणे, अमित साटम, भारती लवेकर व पंकज भोयर, नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझा व उद्योजक विश्वस्त राकेश कोठारी प्रामुख्याने उपस्थित होते.

Gururaja Poojary CWG 2022: भारताला दुसरं पदक, गुरुराजा पुजारीची कांस्य पदकाला गवसणीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.