पंढरपूर:राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर आता मशिदीवरीलच नाही तर राज्यातील प्रसिद्ध देवस्थानांवरील भोंगेही उतरवले जाणार आहेत. याचा फटका पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरालाही बसणार आहे.

राज ठाकरे यांच्या भोंगा बंदी आंदोलनाचा फटका विठ्ठल मंदिराला बसणार आहे. पहाटेची काकडआरती आणि संध्याकाळी दुपारती नामस्मरण आणि आरतीसाठी वापरण्यात येणारे भोंगे बंद करावे लागणार आहेत. मात्र, अज्ञाप यावर निर्णय झाला नसल्याने आज पहाटेची काकडआरती भोंग्यावर झाली आहे.

हेही वाचा –भोंगेबाज राजकारण्यांनी आज हिंदुत्वाचाही गळा घोटला, राऊतांचं राज ठाकरेंवर टीकास्त्र

मंदिरांवरील भोंगेही उतरले पाहिजे – राज ठाकरे

राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्याविरोधात आंदोलन सुरू केलंय. जोपर्यंत सर्व मशिदींवरील भोंगे उतरत नाही तोपर्यंत मशिदीसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाणार, असा इशारा त्यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला. तसेच, भोंग्यांचा हा विषय फक्त मशिदींचा नाहीये. काही मंदिरांवर भोंगे असतील तर तेही खाली आले पाहिजे. ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो ती गोष्ट बंद झाली पाहिजे, असं राज ठाकरे म्हणाले होते. त्यामुळे आता मशिदींसोबतच मंदिरांवरील भोंगेही बंद होणार आहेत.

मुंबई पोलीस आयुक्त आणि सर्व धर्मीय प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टींटची बैठक

मुंबई पोलीस आयुक्तांनी मुंबईतील मंदिर, चर्च, गुरुव्दारा तसेच सर्व धर्मीयांच्या प्रार्थनास्थळांच्या ट्रस्टींची बैठक घेतली. या सर्वांना रितसर लाऊडस्पीकर परवानगीसाठी अर्ज करण्यास सांगितले. ५५ डेसिबलपेक्षा अधिक आवाज झाल्यास कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. लाऊडस्पीकर न लावताही आवाज झाला तरी कारवाई करणार, असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.

हेही वाचा –Raj Thackeray: बाळासाहेबांचं ऐकणार की पवारांचं?; CM उद्धव ठाकरेंना राज यांचा थेट सवाल

तसेच, फक्त एक महिन्याच्या कालावधीसाठी परवानगी देणार, असंही त्यांनी स्पष्ट केलं. ट्रस्टींनी वर्षभर परवानगी देण्याची मागणी केली. मात्र, कायद्यानुसार इतक्या कालावधीसाठी परवानगी देता येत नसल्याचे आयुक्तांनी सांगितलं.
मंदिर तसेच इतर धर्मांच्या प्रार्थनास्थळांनी परवानगीसाठी अर्ज करण्याचे आवाहन पोलीस आयुक्तांनी केलं.

भोंगे उतरत नाही तोपर्यंत मनसेचं आंदोलन सुरुच राहणार; राज ठाकरेंची परखड भूमिकाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.