समस्तीपूर : प्रेम प्रकरणाच्या अनेक घटना आपण पाहत असतो. अशात बिहारमध्ये एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इथे प्रेयसीला भेटायला गेलेल्या प्रिकरासोबत भयंकर घटना घडली आहे. बिहारमधील समस्तीपूरमध्ये रात्रीच्या अंधारात प्रियकर गुपचूप प्रेयसीला भेटायला पोहोचला तेव्हा गावकऱ्यांनी त्याला पकडलं. घटनास्थळी जमाव जमला.

पुढे गावातीला लोकांनी तरुणाला बेदम मारहाण केली आणि दोघांचं गावातील मंदिरात जबरदस्तीने लग्न लावून दिले आणि त्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला. यादरम्यान प्रियकरालाही मारहाण करण्यात आली.

Uttarakhand School Students Crying : शाळेत येताच ८ विद्यार्थिनी रडत-रडत अचानक पडल्या बेशुद्ध, तपास करताच समोर आली धक्कादायक माहिती
हसनपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शकरपुरा गावात राहणारी मुलगी आणि बेगुसराय जिल्ह्यातील गढपुरा येथील एक मुलगा दोन महिन्यांपूर्वी गढपुरा येथील एका शिव मंदिरात भेटले होते. जिथे दोघांमध्ये संवाद सुरू झाला आणि हळूहळू दोघांचे प्रेम वाढले. यानंतर ते रात्रीच्या अंधारात भेटू लागले. दरवेळेप्रमाणे बुधवारी रात्री दोघेही भेटले पण त्यांना गावकऱ्यांनी पकडलं. गावकऱ्यांनी आधी प्रियकराला बेदम मारहाण केली आणि नंतर जबरदस्तीने दोघांचे मंदिरात लग्न लावून दिले.

प्रेयसी तरुणाच्या नातेवाईकांनी जबरदस्तीने लग्न केल्याचा आरोप केला आहे. त्याचवेळी तरुणीच्या म्हणण्यानुसार, दोघांमध्ये २ महिन्यांपूर्वीपासून प्रेमसंबंध सुरू होते. मुलाचे जबरदस्तीने लग्न लावून दिल्याने दोन्ही कुटुंबात तणावाचे वातावरण होते. गावात हा विवाह चर्चेचा विषय राहिला आहे.

आधी कंडोम आणि आता…, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या BJP नेत्याच्या फार्महाऊसवर सापडल्या धक्कादायक वस्तूSource link

Leave a Reply

Your email address will not be published.