रात्रीचे जेवण (dinner) हे दिवसाचे शेवटचे जेवण असते, म्हणून ते खूप महत्वाचे असते. हे हलके आणि हेल्दी ठेवण्याचा सल्ला डॉक्टरांकडन किंवा डाएटिशियन्सकडून हमखास दिला जातो. आयुर्वेदानुसार (Ayurveda) असे काही पदार्थ आहेत जे रात्रीच्या वेळी खाणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. हे शाश्वत सत्य आहे की जड जेवण वजन वाढण्यास कारणीभूत ठरते. जसं म्हटलं जातं की नाश्ता हा राजपुत्राप्रमाणे, दुपारचे जेवण हे राजाप्रमाणे आणि रात्रीचे जेवण हे भिखा-यासारखे खाल्ले जावे. यावरून दिवसभर तुमचा आहार कसा असावा हे समजू शकतं. याउलट जर तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ रात्री खाण्याची इच्छा होत असेल तर तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांना आमंत्रण देऊ शकता.

कारण रात्री शरीराची हालचाल होत नाही, त्यामुळे पचनसंस्था जड अन्न सहजासहजी पचवू शकत नाही. ज्याचा परिणाम तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पोटदुखी, सुस्तपणा या स्वरूपात पाहायला मिळतो. मग तुम्ही कोणत्या प्रकारचे डिनर करावे? आयुर्वेदिक डॉक्टर रेखा राधामणी यांनी सल्ला दिला आहे की, तुम्ही डॉक्टरांना अनेकदा म्हणताना ऐकले असेल की, रात्रीचे जेवण हे कुटुंब आणि पार्टीसाठी असते. पण रात्रीच्या जेवणाची निवड अतिशय काळजीपूर्वक करायला हवी असेही त्या म्हणतात. कारण रात्रीच्या जेवणातील चुकीचा आहार तुमचे आरोग्य बिघडवण्याचे काम करू शकतो. मग रात्री काय खावे? डॉक्टर रेखा यांनी सविस्तर पोस्ट शेअर करून याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

गव्हाचे सेवन

तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या जेवणात गव्हाचे पदार्थ खाणे टाळावे. कारण तो जड (गुरू) प्रकृतीचा आहे. त्यामुळे ते पचायला बराच वेळ लागतो, जे शरीरात अमा (विषाक्त पदार्थ) जमा होण्याचे कारण बनू शकते.

(वाचा :- करोना व मंकीपॉक्ससोबतच ‘हे’ 5 भयंकर आजार ठरतायत WHO साठी डोकेदुखी, ‘या’ 10 कॉमन लक्षणांवर ठेवा बारीक नजर..!)

दही खावं की नाही?

पचनासाठी सुपरफूडचा दर्जा दह्याला मिळाल्यामुळे बहुतांश लोकांच्या रोजच्या जेवणात एक वाटी दह्याचा समावेश आवर्जूव असतो. अशा स्थितीत लोक रात्र आणि दिवसाच्या वेळेचीही पर्वा करत नाहीत. आवडतं म्हणून किंवा हेल्दी समजून रात्रीही दही खातात. पण रात्रीच्या जेवणात त्याचे सेवन आरोग्यासाठी चांगले नाही असे आयुर्वेद डॉक्टर सांगतात. यामुळे शरीरातील कफ आणि पित्ताचे प्रमाण वाढते. त्यामुळे आजारांचा धोकाही दुप्पट वाढतो.

(वाचा :- वयाच्या 60ठी नंतरही होणार नाहीत गुडघे व सांध्यांमध्ये अजिबात वेदना, मजबूत हाडांसाठी आजपासूनच सुरू करा ‘ही’ 5 कामे)

मैद्याचे पदार्थ खाऊ नका

आयुर्वेद डॉक्टर सांगतात की गव्हाप्रमाणेच मैदा देखील जड असतो. त्यामुळे तो पचायला जास्त वेळ लागतो. अशा परिस्थितीत जड अन्न शरीरात अमा (विषाक्त पदार्थ) निर्माण करण्याचे काम करू शकतात.

(वाचा :- Vitamin B6 Foods : व्हिटॅमिन बी6 ची कमतरता शरीराला बनवेल मृत्यूचा सापळा, लगेच खायला घ्या हे 5 पदार्थ..!)

गोड किंवा चॉकलेट

जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची सवय असेल तर आजपासूनच हे व्यसन सोडा. आयुर्वेदिक तज्ञ सांगतात की मुख्यतः गोड चवीचे पदार्थ हे गुरू (जड) प्रवृत्तीचे असतात, जे पचायला कठीण असतात आणि श्लेष्मा म्हणजेच कफ वाढवतात.

(वाचा :- World Hepatitis Day : लिव्हर साफ व मजबूत ठेवून हेपेटायटिसपासून वाचण्यासाठी ताबडतोब खायला घ्या हे 4 पदार्थ..!)

कच्चं सॅलेड

सॅलड्स आरोग्यासाठी खूप चांगले असतात, परंतु कच्चे सॅलड विशेषतः थंड आणि कोरडे असतात. ज्यामुळे शरीरातील वाताचे प्रमाण अनेक पटींनी वाढते. जर तुम्हाला सॅलडमधील पौष्टिक गुण पूर्णपणे आत्मसात करायचे असतील तर ते शिजवून खाणे हा एक आरोग्यदायी व स्वादिष्ट पर्याय आहे.

(वाचा :- Head Neck Cancer symptoms : धोक्याची घंटा, ‘ही’ 6 लक्षणं दिसल्यास सावधान..! असू शकतो मान किंवा डोक्याचा कॅन्सर)

होतात हे गंभीर आजार

रात्रीच्या जेवणासाठी हे वरील पदार्थ टाळण्यामागील कारण स्पष्ट करताना डॉ रेखा सांगतात की रात्री तुमची पचनशक्ती सर्वात कमी असते. त्यामुळे तिला जड अन्न लवकर पचत नाही. अशा परिस्थितीत न पचलेले अन्न तुमच्या शरीरात विषारी पदार्थ जमा करण्यास किंवा हेच उरलेले पदार्थ विषारी पदार्थांमध्ये बदलण्यास कारणीभूत ठरू शकते. याला अमा (विषारी घटक) म्हणतात, ज्यामुळे लठ्ठपणा, मधुमेह, त्वचेचे रोग, आतड्यांचे रोग, हार्मोनल असंतुलन इत्यादी गंभीर समस्या होऊ शकतात.

(वाचा :- मंकीपॉक्सचं रौद्ररूप, स्त्री व पुरूषांच्या प्रायव्हेट पार्ट्सना करतोय टार्गेट, या 3 लक्षणांवर ठेवा बारीक नजर.!)

टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक तपशीलांसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा.

आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितले रात्रीचे जेवण कसे असावे?

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.