मुंबई: मराठी वेब सीरिज ‘रानबाजार’ सध्या (Raanbaazaar) ऑनलाइन जगतात चर्चेचा विषय बनली आहे. ही सीरिज म्हटलं की डोळ्यासमोर नाव येतं ते अभिनेत्री ‘प्राजक्ता माळी’ (Prajakta Mali in Raanbaazaar) हिचं. या सीरिजमधील जबरदस्त अभिनयानंतर अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने कमालीचा प्रेक्षकवर्ग कमावला आहे. अभिनेत्री या सीरिजमधील तिच्या ‘रत्ना’ या भूमिकेविषयीही भरभरुन लिहिताना दिसते आहे. तिने सोशल मीडियावर केलेली प्रत्येक पोस्ट व्हायरल होत आहे. आता देखील प्राजक्ताने तिने व्हॅनिटी व्हॅनमध्ये एका खास गोष्टीचा सराव कसा केला होता, याचा व्हिडिओ शेअर केला आहे.

प्राजक्ता माळी हिने व्हॅनिटीमधील एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती काहीतरी चघळताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘रानबाजार’मधील रत्नाच्या गेटअपमध्ये दिसते आहे. तिने हा व्हिडिओ शेअर करताना म्हटलं आहे की, ‘Vanity मध्ये बसून बडीशेप खात मसाला गुटखा वगैरे खातेय असं भासवण्याची practic. ह्या दिवशी पहिल्यांदा make up केला होता… सुंदर दिसण्यासाठी नाहीत अर्थात.’ प्राजक्ताने एक फोटो देखील या पोस्टसह शेअर केला आहे. रत्नाच्या जांभळ्या रंगाच्या साडीमध्ये प्राजक्ताचा हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत आहे.


प्राजक्ता माळी हिने याआधी देखील ‘रत्ना’चा व्हिडिओ पोस्ट केला होता. या सीरिजचे फिनाले एपिसोड प्रदर्शित होण्याआधी अभिनेत्रीने तिचा ‘रानबाजार’मधील प्रवास मांडणारा हा व्हिडिओ शेअर केला होता.

अभिजित पानसे दिग्दर्शित ‘रानबाजार’ची (Ranbazar) घोषणा झाल्यापासूनच मोठी चर्चा झाली. तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांचा लूक समोर आल्यानंतर ही चर्चा अधिक वाढी. पॉलिटिकल थ्रिलर असणाऱ्या या भव्य वेब सीरिजची ‘असंच काहीसं घडलं होतं… कदाचित ?!’ ही टॅगलाइनच बरेच काही सांगून जाणारी आहे.

हे वाचा-VIDEO: ‘मला आनंद आहे की…’, सुशांतला आठवून क्रिती सेनॉनची भावुक पोस्ट

या सीरिजचे शेवटचे आणि अत्यंत खळबळजनक असे दोन भाग १० जून रोजी प्रदर्शित झाले. प्लॅनेट मराठी या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सीरिजला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला आहे. या सीरिजमध्ये प्राजक्ता-तेजस्विनी यांच्यासह मोहन आगाशे, मोहन जोशी, अभिजीत पानसे, मकरंद अनासपुरे, उर्मिला कोठारे, सचिन खेडेकर, वैभव मांगले, अनंत जोग, माधुरी पवार, सुरेखा कुडची आणि वनीता खरात यांच्या मुख्य भूमिका आहेत.

हे वाचा-जस्टिन बीबर देतोय गंभीर आजाराशी झुंज, व्हायरसमुळे अर्धा चेहरा पॅरालाइझ्ड

अभिनेत्री प्राजक्ता माळी हिच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यांपासून तिने कामाचा सपाटाच लावला आहे. ती वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका असणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये दिसत आहे. अलीकडेच अभिनेत्रीचे पांडू, लकडाऊन बी पॉझिटिव्ह, पावनखिंड हे चित्रपट प्रदर्शित झाले आहेत. याशिवाय चंद्रमुखी या सिनेमात तिने अमृता खानविलकर हिच्यासह ‘सवाल जवाबाची’ लावणी सादर केली होती. आता अभिनेत्री ‘वाय’ या सिनेमात अभिनेत्री मुक्ता बर्वे हिच्यासह स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.