वृत्तसंस्था, नवी दिल्ली : राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या (एनपीएस) सदस्यांसाठी एक खुशखबर आहे. या योजनेमध्ये साठवलेल्या रकमेपासून मिळणारे लाभ आणखी वाढावेत यासाठी या रकमेची गुंतवणूक वेगवेगळ्या मत्ता (अॅसेट) प्रकारांत करण्याची मुभा यापूर्वीच पेन्शन फंड नियामकाने म्हणजेच पेन्शन फंड नियामक व विकास प्राधिकरणाने (पीएफआरडीए) दिली आहे. त्याचा विस्तार करीत मत्तावाटप (अॅसेट अॅलोकेशन) वर्षातून चार वेळा करण्याची मुभा दिली आहे. यामुळे बाजाराची दिशा पाहून त्यातून लाभ घेण्याची संधी ‘एनपीएस’ सदस्यांना मिळणार आहे.

RBI ने घेतला मोठा निर्णय; तब्बल वर्षभरानंतर ‘मास्टरकार्ड’चा मार्ग झाला मोकळा
राष्ट्रीय पेन्शन योजना (एपीएस) अधिक आकर्षक करण्यासाठी ‘पीएफआरडीए’ने काही घोषणा नुकत्याच केल्या. त्यामध्ये निवृत्तीनंतर एनपीएस सदस्याला नियमित स्वरूपात त्याने साठवलेल्या पैशात भर पडून आकर्षक रक्कम मिळावी यासाठी काही बदल या योजनेतच करण्यात आले आहेत. त्यामध्ये इक्विटीमध्ये अधिक रक्कम वळवण्याची मुभा देणे, निधी व्यवस्थापकांचे आणखी काही पर्याय उपलब्ध करून देणे आणि एका आर्थिक वर्षात मत्तावाटपाचे विविध पर्याय देणे यांसारखे बदल केले गेले आहेत.

पीएम श्रम योगी मानधन; निवृत्तीनंतर प्रत्येक वर्षी मिळेल भरघोस पेन्शन, जाणून घ्या…
पेन्शन क्षेत्रामध्ये ३५ लाख कोटी रुपयांच्या मत्ता आहेत. या क्षेत्रामध्ये एनपीएसचा वाटा २१ टक्के आहे. एनपीएसच्या ७.३ लाख कोटी रुपयांच्या मत्ता आहेत.

सार्वभौम सुवर्ण रोखे; स्वस्तात सोने खरेदी करण्याची संधी, जाणून घ्या कशी कराल गुंतवणूक
‘एनपीएस’ने दिलेली सुविधा अशी…
सध्या ‘एनपीएस’ आपल्या सदस्यांना तीन मत्ता गटांमध्ये (अॅसेट क्लास) त्यांच्या पैशाचे वाटप करण्याची मुभा देते. इक्विटी, सरकारी रोखे आणि कॉर्पोरेट बाँड हे तीन मत्ता गट ‘एनपीएस’ने गुंतवणुकीसाठी उपलब्ध करून दिले आहेत. या मत्ता गटांमध्ये बदल करण्याची संधी ‘एनपीएस’ सदस्यांना वर्षातून दोनदा देते. अर्थात ज्या सदस्याने ‘अॅक्टिव्ह चॉइस अॅसेट अॅलोकेशन’ हा पर्याय स्वीकारला असेल, त्यालाच ही सुविधा वापरता येते. आता अशा सदस्यांना मत्ता गटांमध्ये बदल करण्याची सुविधा वर्षातून चार वेळा वापरता येणार आहे. ही मुभा ‘एनपीएस’च्या टियर-१ व टियर-२ खात्यांसाठी असणार आहे.
अशाप्रकारच्या २० हून अधिक क्षेत्रातली सखोल अभ्यासपूर्ण माहितीसह एक्सक्लुझिव्ह इकाॅनाॅमिक टाईम्स स्टोरीज.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.