भारताचा कर्णधार रिषभ पंतकडून एक मोठी चूक घडली आणि त्याचा सर्वात मोठा फटका यावेळी भारतीय संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. या एका चुकीमुळे भारतीय संघाला विश्वविक्रमाची सुवर्णसंधी गमवावी लागली. हा सामना भारताच्या हातात होता, पण पंतने यावेळी मैदानात चांगले नेतृत्व केले नाही. मैदानात त्याच्याकडून एक मोठी चूक घडली आणि त्याचाच फटका भारताला बसला.