म. टा. प्रतिनिधी, पुणे

कथित किडनी रॅकेट्स प्रकरणी (Alleged Kidney Racket) संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या रुबी हॉल क्लिनिकचा (Ruby Hall Clinic) अवयव प्रत्यारोपणाचा दोन महिन्यानंतर मार्ग मोकळा झाला आहे. प्रत्यारोपणासाठीची नव्याने समिती स्थापन करणे तसेच प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची दुसरी टीम तयार करण्याच्या अटीवरच आरोग्य खात्याने ‘रुबी’ला सोमवारी परवानगी दिली. त्यामुळे रुग्णालयातील दोन महिन्यांपासून थांबलेली ब्रेनडेड, जीवंत अवयव प्रत्यारोपणाला पुन्हा गती मिळेल. (the department of health gives permission to the ruby hall clinic to perform organ transplants)

रुबीमध्ये किडनी रॅकेट्सच्या संशयामुळे अवयव प्रत्यारोपणाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. या प्रकरणी आरोग्य खात्याने चौकशी समिती नेमली. पोलिसांनी गुन्हे दाखल झाले. या प्रकरणी रुबी हॉल क्लिनिकने उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. सरकारने स्थापन केलेल्या चौकशी समितीने आपला अहवाल सरकारकडे पाठविला.

क्लिक करा आणि वाचा- आषाढी वारी; एसटीच्या पुणे विभागाची जोरदार तयारी, पंढरपूरसाठी ५३० बस

परवानगी देताना लागू केल्या अटी शर्ती

त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सुनावणी घेऊन त्यावर निर्णय घेतला. त्या निर्णयाच्या तसेच नाशिकचे उपसंचालक भोई यांच्या चौकशी समितीच्या अहवालाच्या अनुषंगाने रुबी हॉल क्लिनिकला पुन्हा प्रत्यारोपणाची परवानगी देताना काही अटी शर्ती लागू केल्या आहेत.

क्लिक करा आणि वाचा- डॉ. प्रकाश बाबा आमटेंना कर्करोगाचं निदान, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार

रुबी हॉल क्लिनिकमध्ये अवयव प्रत्यारोपण कायद्यानुसार यापूर्वी अस्तित्वात असलेली प्रत्यारोपण समिती (कॉम्पिटंट अथॉरिटी) नव्याने तयार करावी. त्यात जुन्या समितीतील कोणत्याही सदस्याचा समावेश राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नवी टीम तयार करावी. त्यात पूर्वीचे तज्ज्ञ डॉक्टरांपैकी कोणीही सदस्य असणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. या दोन्ही समित्यांसाठी रितसर अर्ज करून संबंधित अधिकाऱ्यांची मान्यता घ्यावी, असे आदेश आरोग्य विभागाने दिले आहेत.

क्लिक करा आणि वाचा- क्रिकेट खेळताना दम लागून कोसळला, पुण्याच्या राजकीय कुटुंबातील तरुण लेकाचा मृत्यूSource link

Leave a Reply

Your email address will not be published.