मुंबई : गेल्या काही दिवसांपासून करण जोहरची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेमकहानी’ या सिनेमाची बरीच चर्चा आहे. या सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वी आलियानं तिचं या सिनेमातील काम पूर्ण केल्यानिमित्तानं करणनं तिच्यासाठी रॅपअप पार्टी ठेवली होती. त्यानंतर आता या सिनेमाचंही चित्रीकरण पूर्ण झाल्यानिमित्तानं सर्व कलाकारांसाठी एक रॅपअप पार्टी आयोजित केली होती. या पार्टीतील काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्या फोटोमध्ये एक मराठमोळी अभिनेत्रीदेखील दिसली. यावरून करण जोहरच्या या सिनेमात ही अभिनेत्री काम करत असल्याचं समोर आलं.

बॉयफ्रेंडसोबत बोल्ड फोटोशूट ते बीच वेडिंग! ‘शनाया’ देतेय कपल गोल्स

कोण आहे ही अभिनेत्री

मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार हिंदीमध्ये काम करताना दिसत आहेत. बहुतांश हिंदी सिनेमे, मालिका, वेब सीरिजमध्ये मराठी कलाकारांना प्रमुख भूमिका मिळत आहेत. त्यामुळे उत्तम कलाकाराला कोणत्याही भाषेचं बंधन नसतं हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालं आहे. अशा गुणी कलाकारांची यादी बरीच मोठी आहे. त्यातील एक नाव म्हणजे अभिनेत्री क्षिती जोग (Kshitee Jog). क्षितीनं आतापर्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारल्या आहेत. ती एक उत्तम अभिनेत्री असल्यानं लवकरच ती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनच्या रॉकी और रानी की प्रेमकहानी या सिनेमात दिसणार आहे.


करणची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमाचं चित्रीकरण नुकतंच संपलं आहे. त्यानिमित्तानं करणनं सिनेमातील सर्व कलाकारांसाठी एक जंगी पार्टी ठेवली होती. या रॅपअप पार्टीचा एक व्हिडिओ रणवीरनं सोशल मीडियावर शेअर केला. हाच व्हिडिओ क्षितीनं तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. या व्हिडिओत करण जोहर, रणवीर सिंग, शबाना आझमी, धर्मेंद्र यांच्याबरोबरीनं क्षिती जोग देखील दिसत आहे. याच व्हिडिओमध्ये सर्वजण आनंदानं जल्लोष करताना दिसत आहे. हा जल्लोष सुरू असताना रणवीरनं क्षितीला मिठी मारल्याचं दिसत आहे. यावरून या दोघांमध्ये छान बाँडिंग तयार झाल्याचा अंदाजही वर्तवला जात आहे.


दरम्यान, क्षितीनंही सिनेमाच्या शेवटच्या दिवसाचे काही फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले होते. रॉकी और रानी की प्रेम कहानी सिनेमात क्षितीची भूमिका नेमकी काय आहे, हे अद्याप समोर आलेलं नाही. परंतु तिच्या सारखी गुणी अभिनेत्रीच्या कलागुणांना दाद मिळाली इतकं नक्की. क्षितीनं शेअर केलेल्या या व्हिडिओवर तिच्या अनेक मित्रमैत्रिणींनी तिचं अभिनंदन केलं आहे.

Video : मंगळागौरीला जमलेल्या शेजारणींची ईशावर टीका, अरुंधतीनं दिलं चोख उत्तर!

क्षितीनं ‘झिम्मा’ या सिनेमाच्या माध्यमातून निर्मितीच्या क्षेत्रातही पाऊल टाकलं आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन तिचा नवरा, अभिनेता हेमंत ढोमे यानं केलं होतं. झिम्मा सिनेमाला प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला होता.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.