पिंपरी : मावळ तालुक्यातील कासारसाई धरणाच्या कडलेला उभारण्यात आलेलं हवेतील हॉटेल म्हणजे ‘स्काय डायनिंग’ हॉटेल वादाचा भोवऱ्यात सापडलं आहे. कारण पिंपरी पोलिसांनी या हॉटेल मालकाला नोटीस बजावण्यात आली आहे. त्यानंतर हे हॉटेल मालकाने बंद केले आहे. आवश्यक त्या परवानग्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिले आहेत.

राज्यातील पहिले स्काय डायनिंग हॉटेल म्हणून हे हॉटेल प्रसिद्धीच्या झोतात आले होते. अनेक जणांनी या ठिकाणी जाऊन स्काय डायनिंग करण्याचा आनंद देखील घेतला होता. ग्राहकांना काही तरी वेगळं द्यावं, अशी संकल्पना या हॉटेल मालकाची होती. मात्र पोलिसांकडून हे हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश नोटिसद्वारे देण्यात आले आहेत.

राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या हॉटेलचे उद्घाटन केले होते. १२० फुटवर जाऊन जेवणाचा आगळा वेगळा आनंद या हॉटेलममधून घेता येत होता. मात्र १२० फुटावर जाऊन जेवणाची सोय करणे अत्यंत धोकादायक असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

शिंदे-ठाकरे उद्या आमने-सामने; एकच दिवशी, एकाच वेळी अन् एकाच शहरात दौरा

जेव्हापासून या हॉटेलचे उद्घाटन झाले तेव्हापासून या हॉटेलची जोरदार चर्चा होती. काय वेगळं देता येईल, या उद्देशाने हे हॉटेल सुरू करण्यात आले होते. मात्र आवश्यक त्या कोणत्याही परवानग्या हॉटेल मालकाने घेतल्या नसल्याचे पोलिसांनी पाठवलेल्या नोटीसमध्ये म्हंटले आहे. त्यामुळे राज्यातील पहिले स्काय डायनिंग हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

नड्डांना जाब विचारून स्वाभिमान राखत एकनाथ शिंदेंनी राजीनामा द्यायला हवा: सुषमा अंधारेSource link

Leave a Reply

Your email address will not be published.