मुंबई : अभिनेता सिद्धार्थ चांदेकर हा उत्तम अभिनेता म्हणून प्रसिद्ध आहे. अभिनयाबरोबरच सिद्धार्थ सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रीय असतो. त्याच्या नवीन सिनेमाच्या प्रोजेक्टबद्दल, त्याच्या आयुष्यातील काही घडामोडींबद्दल तो सोशल मीडियावर पोस्ट करत आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असतो.गुणी अभिनेता असलेल्या सिद्धार्थचा सेन्स ऑफ ह्युमर देखील कम्माल म्हणावा असाच आहे. त्याचा विनोदी स्वभाव दाखवणारे अनेक व्हिडिओ, रिल, पोस्ट तो सातत्यानं सोशल मीडियावर शेअर करत असतो. त्याच्या या मजेशीर अशा पोस्टवर चाहते देखील भरभरून लाईक्स आणि कॉमेन्टचा वर्षावर करत असतात.

गेले काही दिवस सिद्धार्थ लंडनमध्ये त्याच्या आगामी काँग्रेज्युलेशन या आगामी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी गेला होता. या सिनेमाचं दिग्दर्शन लोकेश गुप्ते करत आहे. तर पूजा सावंत या सिनेमात सिद्धार्थबरोबर दिसणार आहे. तर या सिनेमाचं चित्रीकरण संपवून काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ मुंबईत परतला आहे. मुंबईत परतल्यानंतर त्यानंतर सिद्धार्थनं एक भन्नाट, मजेशीर असा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाचं हसून हसून पोट दुखणार हे नक्की.

काय आहे व्हिडिओत

सिद्धार्थ त्याच्या इन्स्टावर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हणत आहे की, ‘ यार लंडनमध्ये तुझी खूप आठवण आली. सगळं काही होतं तिथं पण…तू तिथं नव्हतास. केवढा प्रगत देश आहे तो, काय काय आहे तिथं… पण जे तुला जमतं ना ते कुणालाच जमू शकत नाही रे…काय आणि कित्ती मिस केलं आहे यार मी तुला… तुझ्यासारखं कुणीच नाहीये रे या जगात…कुणीच नाही…आय लव्ह यू!’ असं म्हटल्यानंतर सिद्धार्थनं त्याच्या मोबाईलचा बॅक कॅमेऱ्यामधून टॉयलेटमध्ये असलेला हँड स्प्रे झूम करून दाखवतो… हे सगळं सिद्धार्थ त्या स्प्रेला उद्देशून बोलत असतो. कारण लंडन आणि युरोपिय देशांमधील बहुतांश स्वच्छतागृहांमध्ये असे हँड स्प्रे नसतात. दरम्यान, सिद्धार्थ हे सगळं बोलत असताना ‘चांद छुपा बादल में’ या गाण्याचं म्युझिक आपल्याला ऐकू येतं…
विदुला चौगुलेची बॉईज ३ मध्ये हॉट एण्ट्री, ‘चड्डीतली पोरगी पाहिली नाही का कधी?’

सिद्धार्थनं शेअर केलेला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अनेक युझर्सना हसू आवरलं नाही. त्यांनी या व्हिडिओवर भरभरून कॉमेन्ट करायला सुरुवात केली आहे. त्यामध्ये कलाकार मंडळींचाही समावेश आहे. स्पृहा जोशी हिनं ‘घाणेरडा’ असं लिहित हसण्याच्या इमोजी पोस्ट केल्या आहेत. तर काँग्रेज्युलेशन सिनेमात सिद्धार्थची सहकलाकार असलेल्या पूजा सावंत हिनं देखील कॉमेन्ट केली आहे. तिनं लिहिलं आहे की, ‘ मला माहिती आहे हे सगळं तू कसं हँडल केलं ते..’असं म्हणत तिनं हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत. त्यावर सिद्धार्थनंही लगेच उत्तर देताना म्हटलं आहे की,’आपलं दुःख सारखं होतं गं…’ अमृता खानविलकर हिनं देखील ‘ हा हा हा वाटलंच’ अशी कॉमेन्ट केली आहे. त्याशिवाय अनेक युझर्सनीही या व्हिडिओवर भरभरून कॉमेन्ट केल्या आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.