मुंबई: अनुष्का शर्मा आणि विराट कोहली ही जोडी क्रिकेट आणि बॉलिवूडमधील चाहत्यांची आवडती जोडी आहे. त्यांच्या खाजगी आयुष्यात काय चाललय याची बित्तंबातमी अनुष्का आणि विराटच्या चाहत्यांना हवीच असते. त्यात सध्या अनुष्का गेल्या दोन वर्षापासून मुलगी वामिकाला वेळ देण्यासाठी सिनेमापासून लांब आहे. विराट मात्र मैदानावर चौकार षटकार मारताना दिसतोय. त्यातूनही वेळ काढून अनुष्का आणि विराट परदेशाती सुट्टी एन्जॉय करत असतात. काही दिवसांपूर्वी ही जोडी लंडनला सुट्टीसाठी गेली होती. नुकतंच त्यांचं विमान मुंबईत परतलं आणि विमानतळावर ही जोडी फिल्मी फोटोग्राफर्सच्या कॅमेऱ्यात कैद झाली.

तसंही ही जोडी त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशलमीडियावर शेअर करत असतेच. लंडनवरून सुट्टी एन्जॉय करून विमानतळावर उतरलेल्या अनुष्का आणि विराटचा अंदाजही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाल्याचाच होता. हातात हात घालून या जोडीने फोटोग्राफरना पोझही दिल्या. पण हे फोटो आणि व्हिडिओ पाहून चाहत्यांच्या नजरेतून एक गोष्ट सुटली नाही ती म्हणजे अनुष्काला चालताना तोल सावरत नसावा. विराटसोबत चालताना ती अडखळत होती. मग काय, सोशल मीडियावरचे फोटो बघून लंडनमध्ये केलेलं ड्रिंक अजून उतरलं नाही का असा प्रश्न विचारत चाहत्यांनी प्रश्नांचा भडिमार केला.

एअरपोर्ट लुकमध्ये विराट आणि अनुष्का दोघंही खूपच सुंदर दिसत होते. लाइट कलरच्या कॅज्युअल लुकने दोघांनी खूप पसंती मिळवली. अनुष्का लूज टीशर्ट आणि डेनिममध्ये दिसली तर विराटने टीशर्टवर ओपन शर्ट आणि शॉर्ट घातली होती. अनुष्काने काळ्या रंगाची तर विराटने नियॉन् रंगाची कॅपही घातली होती. चष्म्यामुळे दोघंही कुल दिसत होती.

अनेक वर्ष रिलेशनशीप, नंतर ब्रेकअप पुन्हा पॅचअप अशा चर्चा घडवत २०१७ ला अनुष्का आणि विराट यांनी इटलीमध्ये लग्न केलं. लग्नानंतर मुलगी वामिकाचा जन्म झाला त्यामुळे अनुष्काने सिनेमातून ब्रेक घेतला. बरेच दिवस वामिकाचा चेहरा पाहण्यासाठी नेटकरी अनुष्का आणि विराटच्या सोशलमीडिया पेजवर नजर लावून होते. वामिकाला दोघांनीही फार कॅमेऱ्यासमोर आणलेलं नाही. पण तिचा चेहरा लपवून लेकीचे फोटो दाखवण्याची हौस दोघांनाही असते.

अनुष्का मोठया ब्रेकनंतर लवकरच सिनेमात दिसणार आहे. येत्या सप्टेंबर महिन्यात चकडा एक्स्प्रेस हा तिचा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात महिला खेळाडू झूलन गोस्वामीची भूमिका करणार आहे. यापूर्वी सुलतान या सिनेमात अनुष्काने कुस्तीपटू साकारली होती. अनुष्काला पुन्हा पडदयावर पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत.

Source link

Leave a Reply

Your email address will not be published.