देहरादूनः जगातील सर्वोत्तम लष्करी प्रशिक्षण अकादमीपैकी एक असलेल्या ‘इंडियन मिलिटरी अकादमीचे पासिंग आउट संचलन अलीकडेच पार पडले. अकादमीत ३७७ युवकांनी भाग घेतला होता. संचलन अकादमीच्या पासिंग आउटनंतर २८८ अधिकारी भूदलात रुजू होणार आहेत. पासिंग आऊट संचलनात भाग घेतलेल्या जम्मूच्या बाबा दानिश लैंगर यांची प्रेरणादायी कहाणी वाचून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल.

बाबा दानिशला २०१७साली लकवा मारला होता. गुइलेन बैरे सिंड्रोम या आजाराने दानिश ग्रासला होता. दानिशला लहाणपणापासून सैन्यात जाऊन देशाची सेवा करण्याचे स्वप्न होते. मात्र, या आजारामुळं ते स्वप्न पूर्ण करता येणार नाही याची भीती जाणवू लागली. मात्र, त्याने प्रयत्न सोडले नाहीत. आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर त्याने या आजारावर मात केली.

लकवा मारल्यानंतर दानिश पूरता खचला होता. आपलं स्वप्न आपल्यापासून हिरावत चाललं आहे ही कल्पनाच त्याला सहन होईना. मात्र, या कठिण प्रसंगावर त्यांने मोठ्या धैर्याने सामना केला. दानिशने पूर्ण लक्ष त्याच्या स्वप्नांवर केंद्रित केले. दानिश यांचे पती मृदा संरक्षण विभागात अधिकारी आहेत. दानिशला लकवा मारल्यानंतर त्यांनी त्याच्यासाठी फिजिओथेरपी सुरू केली. सैन्यात अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या दानिशने व्यायामाला सुरुवात केली आणि अवघ्या सहा महिन्यातच त्याने त्याच्या आजारावर मात केली.

वाचाः दोन बायकांचा दादला; मेहुणीसोबतही जुळलं सूत; लग्नाचा आग्रह करताच…; नाशिकमध्ये धक्कादायक घटना

माझ्या मुलावर अनेक संकटे आली. वाईट वेळही आली. पण त्याने सर्व संकटांवर मात करुन आपलं ध्येय पूर्ण केलं. आज मला त्याचा अभिमान आहे. सैन्य अधिकाऱ्याचा वडिल असण्याचा मला खूप अभिमान आहे, असं दानिश यांच्या वडील राजेश लैंगर यांनी म्हटलं आहे.

जीबीएस म्हणजे काय?

जीबीएस हा एक दुर्मिळ आजार आहे. ऑटोइम्यून डिसऑर्डर आहे. ज्याचा शरिरातील मज्जासंस्थेवर परिणाम होतो. या आजारामुळं एखादा व्यक्ती एक वर्षांपर्यंत अंथरुणाला खिळू शकतो. प्लाझ्मामुळं या आजार बरा होऊ शकतो.

दानिश लैंगर यांच्या वर्गमित्रांनी त्याचे कौतुक केलं आहे. दानिशच्या ध्यैर्याचं कौतुक करावं तितकं कमी आहे. त्यांच्यावर ओढावलेल्या प्रसंगात अनेकांनी हार मानली. पण दानिशने त्याचे स्वप्न पूर्ण केले. आम्ही सर्व त्याच्यासाठी खूप खुष आहोत.

वाचाः दिवस चांगला जाण्यासाठी घरात मुंगूस पाळले; वनविभागाला खबर लागली अन्…Source link

Leave a Reply

Your email address will not be published.