मुंबई :लगान सिनेमा सुपर डुपर हिट ठरला. ऑस्करच्या नामांकन अंतिम यादीत येण्याचा मानही या सिनेमानं मिळवला. १५ जून २००१ ला हा सिनेमा रिलीज झाला होता. बघता बघता त्याला २१ वर्ष झाली.

Video: सारा अली खानला पाहिल्यावर कार्तिकने मारली घट्ट मिठी

अलिकडेच बाॅलिवूडचा परफेक्शनिस्ट आमिर खानने ‘लगान: वन्स अपॉन ए टाइम’ची २१ वर्ष त्याच्या घरी मरिना इथे साजरी केली. या सोहळ्यासाठी चित्रपटातील नामवंत कलाकारही यावेळी घरी उपस्थित होते. १५ जून २००१ रोजी प्रदर्शित झालेला लगान हा भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक आहे. ऑस्कर आणि अकादमी पुरस्कारांसाठी नामांकन मिळालेल्या तीन भारतीय चित्रपटांपैकी हा एक होता.

आमिर खानच्या प्रॉडक्शनने ‘लगान’ टीमच्या इंटिमेट सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये चित्रपटातील ‘चले चलो’ हे गाणं वाजत असून संपूर्ण टीम एकत्र धमाल करताना दिसत आहे.

या कलाकारांची उपस्थिती
आमिर खान आणि संपूर्ण टीमसाठी ‘लगान’ला भावनिक महत्त्व आहे. २०२१ मध्ये महामारीच्या काळात, चित्रपटाच्या रिलीजला २० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आमिरनं वर्चुअल गॅदरिंग केलं होतं. पण यावेळी दिग्दर्शकासह संपूर्ण स्टारकास्ट या एव्हरग्रीन चित्रपटाचा उत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आले. आशुतोष गोवारीकरपासून ते अखिलेंद्र मिश्रा, ग्रेसी सिंग, यशपाल शर्मा, रघुवीर यादव, राजेश विवेक उपाध्याय, दया शंकर पांडे, राजेंद्रनाथ झुत्शी, राजा अवस्थी, सुहासिनी मुळे, प्रदीप रामसिंग रावत, अमीन गाझी यांच्यासह अनेक कलाकार यावेळी उपस्थित होते.

लगानचे हक्क हवेत

दरम्यान, लगानला आतापर्यंत यश मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यूकेच्या अनेक आघाडीच्या निर्मात्यांनी आमिर खान प्रॉडक्शनला चित्रपटाच्या हक्कांसाठी विनंती केली आहे आणि वेस्ट एंड थिएटरबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे.

‘हिंदी सिनेमा हवा असेल तर …’ मराठी अभिनेत्रीनं सांगितला कास्टिंग काऊचचा धक्कादायक

लगान ही 1893 मधील भारतातील ब्रिटीश साम्राज्याच्या व्हिक्‍टोरियन काळातील कथा आहे. आशुतोष गोवारीकर यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून आमिर खान प्रॉडक्शनने याची निर्मिती केली आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा एअरपोर्टवर स्पॉटSource link

Leave a Reply

Your email address will not be published.