सध्या कोणालाही कसलंही उत्तर हवं असेल तर लोकं गुगलकडे (Google search) वळतात. कारण बसल्याजागी कोणतंही उत्तरं मिळवता येतं. त्यात जास्त मेहनत देखील लागत नाही. अनेक प्रश्न तर खूप अतरंगी आणि सतरंगी असतात जे आपण सहसा कोणाला विचारू शकत नाही, मग असे प्रश्न देखील बिनधास्त गुगलला विचारले जातात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का लग्न झाल्यावर स्त्रिया गुगलवर सर्वाधिक व वारंवार काय सर्च करतात?

आम्हाला माहिती आहे हा प्रश्न तुमच्या मनात देखील आला असणार आणि या प्रश्नाचे उत्तर शोधण्याची खुमखुमी तुमच्यातही जागृत झाली असणार. तर याच प्रश्नाचे उत्तर आपण आजच्या या लेखातून जाणून घेणार आहोत. हे असे प्रश्न आहेत जे पाहून तुम्हाला देखील हसणे कंट्रोल होणार नाही आणि पुरूष तर अक्षरश: हैराण होतील महिलांचे असले विचार वाचून..!

नवऱ्याबाबत जास्त सर्च केले जाते

गुगलकडे असलेल्या आकडेवारीनुसार जास्तीत जास्त लग्न झालेल्या स्त्रिया आपल्या पतीबाबतच्या अनेक गोष्टी गुगल मध्ये सर्च करतात. स्त्रिया आपल्या पतीची पसंत आणि नापसंत याबाबत गुगलला अधिकाधिक प्रश्न विचारतात. मात्र यात काही वावगे देखील नाही. जगातील प्रत्येक स्त्रीला लग्नानंतर हा प्रश्न सतावत असतो की तिच्या पतीला नक्की काय आवडते आणि काय नाही? काही स्त्रिया तर मनातच पतीबाबत अशा प्रश्नांचा विचार करत असतात ज्या त्या अन्य कोणाला विचारू शकत नाहीत. अशावेळी त्यांचा आधार गुगलच असतो.

(वाचा :- करोडो रूपयांच्या मालकिन व देशातील पहिल्या महिला इंजिनियर सुधा मुर्तीं कशा झाल्या इतक्या यशस्वी? ऐकून व्हाल थक्कच)

पतीला आपल्या तालावर कसे नाचवावे?

तुम्हाला हे ऐकून हसू येईल पण वास्तवात सुद्धा अशा काही स्त्रिया असतात ज्यांना आपल्या पतीला आपल्या मुठीत ठेवण्याचा आणि आपल्या तालावर नाचवण्याचा उपाय हवा असतो. ज्या स्त्रियांना आपल्या पतीने आपलेच रहावे असे वाटत असते अशा स्त्रियांच्या मनात असे प्रश्न सर्वाधिक असतात आणि त्या याच बाबत गुगलवर सर्च करतात. एवढेच नाही तर त्यांना अजून एक प्रश्न असतो की त्या आपल्या पतीला खुश ठेवू शकत आहेत की नाही आणि पतीला खुश कसे ठेवायचे याचे ऑप्शन सुद्धा त्या सतत शोधत असतात. यामध्ये त्या फक्त विविध रेसिपीच नाही तर गिफ्ट ऑपशन्स सुद्धा शोधतात असं संशोधनात समोर आलं.

(वाचा :- माझी कहाणी : मी एका अनोळखी मुलीला एक रात्र घरात राहून दिलं, त्या एका रात्रीत असं काही घडलं की माझं आयुष्यच पूर्ण बदलून गेलं)

पतीला घायाळ करण्यासाठी टिप्स

पतीला वेडं करणे म्हणजे खरोखर वेडं करणे नाही तर आपलं वेड लावणं किंवा आपल्या मादकतेने घायाळ करणं होय. आपल्या पतीला आपले वेड कसे लावता येईल. तो सतत आपल्याबाबतच कसा विचार करेल, आपल्या मागे मागेच कसा येईल हे जाणून घेण्याची काही स्त्रियांना खूप उत्सुकता असते आणि हे प्रश्न त्या गुगलला अधिकाधिक विचारतात आणि याची उत्तरे देखील गुगलवर आहेत बरं का आणि त्यामुळे त्यांना याबाबत अधिकाधिक प्रश्न पडत जातात आणि याबाबत त्या अधिकाधिक प्रश्न विचारत जातात. याशिवाय बाळाला जन्म देण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे व यासाठी नव-याला कसं तयार करावं किंवा विविध मेकअप टिप्स देखील त्या गुगलवर सर्च करत असतात ज्यामुळे नवरा खुश राहिल व दुस-या महिलेकडे आकर्षित होणार नाही.

(वाचा :- माझी कहाणी : मी 12 वी मध्ये शिकणारी मुलगी असून माझ्यावर एक अत्यंत वाईट प्रसंग बेतला आहे, असं कोणासोबतच घडू नये)

प्रोफेशनशी संबंधित हे प्रश्न

ही गोष्ट तर कोणीच नाकारणार नाही की लग्नानंतर स्त्रियांचे आयुष्य खूप जास्त बदलून जाते. त्या आता एकट्या नसतात तर त्यांच्यावर सर्व कुटुंबाची जबाबदारी असते. त्यामुळे जर त्यांच्या मनात करियरबाबत एखादे स्वप्न वा इच्छा असेल तर ती बाजूला ठेवावी लागले. करियर हे त्यांच्यासाठी सेकंड चॉईस बनते. त्यामुळे घरच्या घरी बसून आणि कुटुंब सांभाळत कोणते करियर करता येऊ शकते हे जाणून घेण्याकडे विवाहित स्त्रियांचा मोठा कल असतो असे दिसून आले आहे.

(वाचा :- माझी कहाणी : आई-वडिलांना माझं लग्न होऊन द्यायचं नाहीये, दोघांनी मला मारून टाकण्याची धमकीही दिली आहे, काय करू..!)

कुटुंबाला खुश कसे ठेवावे?

स्त्रिया फक्त आपल्या पतीचाच विचार करतात असे नाही तर अनेक स्त्रिया अशा असतात ज्या आपल्या कुटुंबासाठी झटत असतात आणि आपल्या कुटुंबाला खुश कसे ठेवता येईल याबाबत त्या गुगलवर सर्च करतात असेल दिसून आले आहे. कुटुंबाची जबाबदारी कशी उचलावी? घरच्यांना खुश कसे ठेवावे? एक आदर्श स्त्री कसे व्हावे? सासूला खुश कसे करावे? यांसारखे प्रश्न त्यांना सतावत असतात आणि या प्रश्नांबाबतच त्या अधिकाधिक प्रश्न गुगलवर सर्च करतात.

(वाचा :- माझी कहाणी : मला एक गंभीर आजार झाला आहे, जी गोष्ट मी नवरा व सासरच्या मंडळींपासून लपवली आहे, पण आता मला भीती वाटतीये)Source link

Leave a Reply

Your email address will not be published.