पालीः लग्नकरण्यासाठी आता दाढी बंधनकारक असल्याचा निर्णय राजस्थान राज्यातील पाली जिल्ह्यात घेण्यात आला आहे. कुमावत समाजातील पंचांनी हा फतवा काढला आहे. नवरदेवाच्या दाढीवरुन घेण्यात आलेल्या या निर्णयाची सध्या जोरदार चर्चा आहे.

पाली जिल्ह्यातील १९ गावांच्या लोकप्रतिनिधींनी एका बैठकीत नवीन नियमांचा ठराव संमत केला. त्यानुसार, गावातील कोणत्याही कुटुंबातील विवाह विधींमध्ये नवरदेवाला दाढी करणे बंधनकारक असणार आहे. दाढी करुन लग्नाला बसला तरच सप्तपदी होणार आहेत. विवाह हा संस्कार असून त्याचं पालन करणं आवश्यक आहे, असं बैठकीत समाजातील लोकांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

विवाह सोहळ्यात नवरदेव राजा म्हणून पाहिलं जातं. त्यामुळं दाढी वाढवून विधी करणं योग्य नाही. लग्नातील फॅशनची आम्हाला कोणतीही अडचण नाही. मात्र, दाढी वाढवून लग्न करण्याला समाज मान्यता देणार नाही. तसंच, लग्नसमारंभात अफू आणि तिजारा देण्यावरही बंदी घालण्यात आली आहे.

वाचाः अग्निपथ योजनेला पाच राज्यात कडाडून विरोध; विद्यार्थ्यांनी ट्रेनच्या डब्याला लावली आग

हळली समारंभात पिवळे कपडे, पिवळी फुले, मेकअपबाबतीतही नियम घालून देण्यात आले आहेत. सर्व विधी जुन्या परंपरेनुसारच करावेत. सर्व विधी परंपरेनुसारच करावेत.असंही समाजाच्या सभेत स्पष्ट करण्यात आलं आहे. इतकंच नव्हे तर, सभेला उपस्थित राहणाऱ्या १९ गावांतील लोकांनी या नियमांचे पालन करावं, अशा सक्त सूचनाही देण्यात आल्या आहेत.

दागिन्यांवर मर्यादा

लग्नात वधूच्या कपड्यांसोबत जास्तीत जास्त दोन तोळे सोने आणि दोन चांदीचा कंदोरा देता येईल. तर, हुंडा म्हणून जास्तीत जास्त ५ तोळे सोने, अर्धा किलो चांदी आणि ५१ हजार रुपये रोख देता येईल, असंही समाजातील सभेत ठरवण्यात आलं.

वाचाः मुलाच्या लग्नाची पूजा ठेवली, पण घडलं अघटित; नदीवर पूजा करताना दाम्पत्याला जलसमाधीSource link

Leave a Reply

Your email address will not be published.